Dainik Maval News : मावळ तालुक्यात आता थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. डोंगराळ भाग असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक थंडी जाणवू लागली आहे. पवन मावळात डोंगराळ भाग आणि गर्द वनराई असल्याने येथील जवळपास सर्वच गावातील नागरिकांना आता बोचऱ्या थंडीची जाणीव होऊ लागली आहे.
सकाळच्या सुमारास दाट धुक्याची चादर परिसरातील डोंगरांवर आणि शेत शिवारांवर पसरत आहे. दिवसभर काहीसे उन्हे जाणवल्यावर पुन्हा सायंकाळच्या सुमारास वातावरणात कमालीचा गारवा जाणवत आहे. कामगार, दुग्ध विक्रेते, शाळकरी विद्यार्थी, शेतमजूर यांना या थंडीचा सर्वाधिक सामना करावा लागत आहे.
पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात असणाऱ्या गावांमध्ये थंडीची तीव्रता अधिक आहे. अद्याप कडाक्याची थंडी पडली नसली तरीही वातावरणातील गारठा वाढू लागल्याने लवकरच गुलाबी थंडीची चादर सर्वत्र पसरेल असे चित्र दिसत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीचे वेध, शेतीची मशागत सुरु । Maval News
– आव्हानांचा डोंगर पार करून सुनिल शेळके कसे विजयी झाले? वाचा शेळके यांच्या विजयाची 5 मुख्य कारणे । MLA Sunil Shelke
– सुनिल शेळके यांच्या ऐतिहासिक विजयानंतर मावळात गावोगावी विजयी मिरवणूका, डिजेच्या ठेक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष