Dainik Maval News : मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या, वडगाव मावळ शहराचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. काल्याच्या कीर्तनाने श्री तुलसी रामायण कथा सप्ताहाची सांगता झाली. यावेळी असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
कार्तिक जन्माष्टमी उत्सवानिमित्त श्री तुलसी रामायण कथा सप्ताह सुरू करण्यात आला होता. या सप्ताह काळात हभप बाबाजी महाराज काटकर यांनी श्री तुलसी रामायण कथा निरुपण केली. कथा श्रवण करण्यासाठी वडगाव शहरासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते.
शनिवारी रात्री १२ वाजता श्री काळभैरवनाथ पोटोबा महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला, तत्पूर्वी हभप तुषार महाराज दळवी यांची देवजन्माची कीर्तनसेवा संपन्न झाली. सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट केली होती.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीचे वेध, शेतीची मशागत सुरु । Maval News
– आव्हानांचा डोंगर पार करून सुनिल शेळके कसे विजयी झाले? वाचा शेळके यांच्या विजयाची 5 मुख्य कारणे । MLA Sunil Shelke
– सुनिल शेळके यांच्या ऐतिहासिक विजयानंतर मावळात गावोगावी विजयी मिरवणूका, डिजेच्या ठेक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष