व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान राबविले जाणार । Maval News

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान राबविण्यात येत असून तालुक्यातील सर्व शाळांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी केले आहे. पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या तपासणी अहवालामध्ये असणारे सर्व विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व लिपिक यांची सहविचार सभा नुकतीच तळेगाव दाभाडे येथील अ‌ॅड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर येथे संपन्न झाली. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूंज, मावळ तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, कार्याध्यक्ष रमेश आरगडे, सचिव विकास तारे, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. डिसेंबर महिन्यामध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण आणि शहरी माध्यमिक शाळा असे दोन महत्त्वाचे गट करण्यात आले आहे. प्रत्येक गटात ५०० पर्यंत विद्यार्थी असलेल्या शाळा, ५०० ते १००० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा व १००० चे वर विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा असे गट राहणार आहेत. मावळ तालुक्यात माध्यमिक स्तरावर एकूण ८३ शाळा असून त्यातील सर्व शाळांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष विठ्ठल माळशिकरे तसेच पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 6, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Educational quality promotion campaign will be implemented in Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान राबविण्यात येत असून तालुक्यातील सर्व शाळांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी केले आहे.

पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे.

अभियानाच्या तपासणी अहवालामध्ये असणारे सर्व विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व लिपिक यांची सहविचार सभा नुकतीच तळेगाव दाभाडे येथील अ‌ॅड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर येथे संपन्न झाली. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूंज, मावळ तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, कार्याध्यक्ष रमेश आरगडे, सचिव विकास तारे, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

डिसेंबर महिन्यामध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण आणि शहरी माध्यमिक शाळा असे दोन महत्त्वाचे गट करण्यात आले आहे. प्रत्येक गटात ५०० पर्यंत विद्यार्थी असलेल्या शाळा, ५०० ते १००० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा व १००० चे वर विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा असे गट राहणार आहेत.

मावळ तालुक्यात माध्यमिक स्तरावर एकूण ८३ शाळा असून त्यातील सर्व शाळांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष विठ्ठल माळशिकरे तसेच पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देवाभाऊ 3.0 : “मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” राज्यात नव्या ‘देवेंद्र’पर्वाचा आरंभ । Maharashtra New CM
– मुख्यमंत्री बनताच देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
– “मी अजित आशाताई अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की… अजित पवार यांनी विक्रमी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ  


dainik maval jahirat

Previous Post

शेतातून जाऊ नको म्हटल्याने शेतकऱ्याच्या डोक्यात घातला दगड । Maval Crime

Next Post

पवना धरणात 2 युवक बुडाल्याचे प्रकरण : बंगला मालकासह नाव मालकाविरुद्ध गुन्हा दाखल । Pavana Dam News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
2 youths drowning in Pavana Dam case registered against bungalow owner along with boat owner

पवना धरणात 2 युवक बुडाल्याचे प्रकरण : बंगला मालकासह नाव मालकाविरुद्ध गुन्हा दाखल । Pavana Dam News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.