व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्यातील कोणत्याही कार्यालयातून करता येणार दस्त नोंदणी ; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ योजना

दस्त नोंदणी होणार अधिक सोपी आणि पारदर्शक ; दस्तऐवज नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविणार

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 10, 2025
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Deed registration can be done from any office in state CM Fadnvis announced One State One Registration scheme

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल विभागाच्या पुढील शंभर दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.

आपल्याकडे एक उपरोधिक म्हण आहे, सरकारी काम आणि दहा महिने थांब. कोणत्याही छोट्यात छोट्या शासकीय कामासाठी जाणारा प्रचंड कालावधी, हेलपाटे मारणे यातून ही म्हण जन्माला आली. मात्र, आता लोकांचे हेलपाटे लवकरच बंद होणार आहेत. कोणत्याही नोंदणीच्या कामासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात वारंवार जावे लागते. त्यात जाणारा वेळ वाचावा यासाठी ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.

राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

घरबसल्या करा दस्त नोंदणी
कोणत्याही दुय्यम निबंध कार्यालयात दस्त नोंदणी करण्याकरता ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. या संकल्पनेमुळे नागरिकांना आता घरबसल्या दस्त नोंदणी करता येणार आहे. सोबतच महसूल विषयक दस्त नोंदणी करता फेसलेस प्रणाली देखील राबवली जाणार आहे.

दस्त नोंदणी म्हणजे काय?
मृत्युपत्र, खरेदीखत, अभिहस्तांतरण, खरेदीखत, करारनामा, भाडेपट्टा, गहाणखत, अदलाबदल पत्र, बक्षीसपत्र, वाटपपत्र असे विविध प्रकारचे दस्त नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– निर्णयाचे ढोल वाजविले… आता पुढे काय ? पुणे – लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्र्रॅकचे काम अद्यापही फायलीत अडकले
– महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ , गतीमान कारभारासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय, जाणून घ्या अधिक
– पाणी पुरवठा योजनांची कामे ठरविलेल्या मुदतेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार


Previous Post

पाणी पुरवठा योजनांची कामे ठरविलेल्या मुदतेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार

Next Post

क्रॉपसॅप योजनेअंतर्गत मळवंडी ठुले गावात रब्बी हंगाम सभा । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Rabi season meeting was held in Malwandi Thule village under CROPSAP scheme

क्रॉपसॅप योजनेअंतर्गत मळवंडी ठुले गावात रब्बी हंगाम सभा । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.