Dainik Maval News : क्रॉपसॅप योजनेअंतर्गत मळवंडी ठुले गावात रब्बी हंगाम सभा घेण्यात आली. कृषि अधिकारी काले कॉलनी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि सहायक विकास गोसावी यांनी ही सभा घेतली.
रब्बी हंगाम गाव बैठकीमध्ये शेतकऱ्यांना हरभरा, गहू व ज्वारी पिकाविषयी माहिती देण्यात आली. तसेच पीएम किसान योजनेतील नाकारण्यात आलेली यादी वाचून दाखविण्यात आली. कागदपत्रे अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी उसाचे पाचट जाळण्याऐवजी ऊस पाचट कुट्टी करावी, खोडवा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रोजगार हमी योजना अंतर्गत बांबू लागवड योजनेसंबंधित माहिती दिली गेली.
सद्यस्थितीत थंडी असल्याने गहू पिकासाठी वातावरण पोषक आहे. मळवंडी ठुले सह पवन मावळ परिसरात गहू, हरभरा, ज्वारी पीक चांगले आले असून पिकावर रोग आढळून आल्यास कृषि विभागाच्या सल्ल्याने फवारणी करावी, असे कृषि सहाय्यक विकास गोसावी यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– निर्णयाचे ढोल वाजविले… आता पुढे काय ? पुणे – लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्र्रॅकचे काम अद्यापही फायलीत अडकले
– महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ , गतीमान कारभारासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय, जाणून घ्या अधिक
– पाणी पुरवठा योजनांची कामे ठरविलेल्या मुदतेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार