व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणारी समाज सेवा संघातर्फे श्रीक्षेत्र देहू येथे कै. विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी यांची 92वी जयंती उत्साहात साजरी

संघातर्फे प्रमुख पाहुण्यांचा श्री विठ्ठल खिलारी (लोणारी) लिखित "सवळा" कांदबरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित स्थानिक ज्येष्ठ समाज बंधू - भगिनींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 15, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lonari Samaj Seva Sangh celebrated birth anniversary of Vishnupant Ramchandra Dadre Lonari at Dehu

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र देहू याठिकाणी लोणारी समाज सेवा संघातर्फे रविवारी (दि.12) लोणारी समाजाचे भिष्म पितामह, समाज रत्न कै. विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी यांच्या 92वी जयंती मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.

सर्वात आधी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कै. विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात झाली. संघातर्फे प्रमुख पाहुण्यांचा श्री विठ्ठल खिलारी (लोणारी) लिखित “सवळा” कांदबरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित स्थानिक ज्येष्ठ समाज बंधू – भगिनींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटसकर यांनी कै. विष्णुपंत रामचंद्र दादरे साहेबांचे जीवनचरित्र कथन केले. याचबरोबर रामभाऊ खांडेकर, संजय बाड सर, सुखदेव नरळे, सुरेखा आवटे यांनी उपस्थित समाज बांधवांना संबोधित केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती वनाबाई माणकोजी ढोणे ट्रस्ट आळंदी व पुणेचे अध्यक्ष रामभाऊ खांडेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोणारी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ खंडेराव पाटसकर (पंढरपूर), उद्योजक दत्तात्रय शरदराव लगड (लोणारी) पुणे, सामाजिक कार्यकर्ते संजय बाड सर (पुणे), सुखदेव नरळे (चिंचवड), अजित गंगलमाले (निगडी) हे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसन खिलारे, अमोल जयवंत करांडे, घनश्याम महादेव गवंड, भगवंत आवटे, गुलाब नरळे, नितीन शेळके, संतोष गळवे, मुकेश हिप्परकर, संदीप करचे, दिपक खोत, नवनाथ काळेल, सचिन काळेल, बापूराव राणे, बाळासाहेब करांडे, राजू काळेल यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भगवंत आवटे यांनी केले. संघाचा वर्षभराचा आढावा संस्थापक अध्यक्ष अमोल जयवंत करांडे यांनी मांडला. आभार प्रदर्शन संदीप करचे यांनी मानले. प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संयोजक व कार्यकारिणीचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित समाज बांधवांनी स्वादिष्ट व रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला. लोणारी समाज सेवा संघ देहुचे अध्यक्ष अमोल करांडे यांनी ही माहिती दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंदर मावळातील बेलज – राजपुरी रस्त्याची प्रचंड दुरावस्था ! पर्यटन व्यवसायावर होतोय परिणाम । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’
– मावळवासियांना मोठा दिलासा ! वडगाव येथे कायमस्वरुपी उपविभागीय कार्यालय सुरु होणार । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ । Pune Ring Road

Next Post

ओझर्डे गावातील दोन वर्षाच्या रायाजीने सर केला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Two-year-old Rayaji Ghare of Ozarde village in Maval climbed the highest fort in Salher Maharashtra

ओझर्डे गावातील दोन वर्षाच्या रायाजीने सर केला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.