व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बाजार समितीवर कुणाची सत्ता राहणार ? मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची नव्याने निवड होणार

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती संभाजी शिंदे व उपसभापती नामदेव शेलार हे लवकरच राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 16, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
maval-bajar-samiti-election-result

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती संभाजी शिंदे व उपसभापती नामदेव शेलार हे लवकरच राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर बाजार समितीच्या महत्वाच्या पदावर आपली वर्णी लागावी, यासाठी आतापासूनच संचालकांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. तालुक्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका व राजकीय बदलांनंतर बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीची ही प्रक्रीया प्रतिष्ठेची असणार यात शंका नाही.

२०२३ मध्ये झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार महर्षी माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे आणि आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वातील पॅनलने घवघवीत यश मिळविले होते. परंतु विधानसभा निवडणूकीवेळी मावळच्या राजकारणात मोठे बदल झाले. विशेषतः राष्ट्रवादीत उभी फूट पडली. यामुळे आता जेव्हा सभापती व उपसभापती पदाची निवड होईल तेव्हा कुणाचे पारडे जड राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान सभापती व उपसभापती पदाची निवडणूक २४ मे २०२३ रोजी झाली होती. त्याला आता अठरा महिने पूर्ण होत आहेत. सर्व निवडून आलेल्या संचालकांना पदाची संधी मिळावी असे धोरण ठरले असल्यामुळे विद्यमान सभापती, उपसभापती यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत, अशा जोरदार हालचाली सुरू असून इतर इच्छुक संचालक याबाबत अधिक आग्रही आहेत.

बाजार समितीचे एकूण १८ संचालक असून यापैकी सभापती म्हणून शिंदे आणि उपसभापती म्हणून शेलार यांना संधी मिळाली आहे. यानंतर ही पदे आपल्याला मिळावीत, अशी इतर संचालकांची इच्छा आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने विद्यमानांच्या राजीनाम्यानंतर रिक्त पदावर आपली वर्णी लागावी यासाठी आतापासूनच संचालकामध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामुळे नेमकी कुणाच्या गळ्यात सभापती व उपसभापती पदाची माळ पडते हे पाहावे लागेल.

  • सध्या बाजार समितीमध्ये विद्यमान सभापती व उपसभापती वगळता संचालक म्हणून सुभाष रघुनाथ जाधव ,मारुती नाथा वाळुंज, दिलिप नामदेव ढोरे, विलास सदाशिव मालपोटे, बंडू दामू घोजगे, साईनाथ दत्तात्रय मांडेकर, सुप्रिया अनिल मालपोटे, अंजली गोरख जांभुळकर, शिवाजी चिंधु असवले, नथुराम शंकर वाघमारे, विक्रम प्रकाश कलवडे, विलास बबन मानकर, अमोल अरुण मोकाशी, ॲड भरत दशरथ टकले, नामदेव ज्ञानेश्वर कोंडे, शंकर उर्फ बाळासाहेब अंतू वाजे आदी काम संचालक करीत आहेत. यापैकी अनेकांना सभापती किंवा उपसभापती पदी आपली निवड व्हावी, असे वाटत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ
– मावळ तालुक्यातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यास विरोध । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात दोन वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न, अपहरणकर्त्याला पालकांनी दिला चोप । Lonavala News

Next Post

येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
cm Devendra Fadnavis

येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.