व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा । Talegaon Dabhade

नवीन उद्योगांकडे विद्यार्थ्यांनी डोळसपणे पाहिले पाहिजे : कौस्तुभ कुलकर्णी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 27, 2025
in लोकल, शहर
76th Republic Day was celebrated with enthusiasm at Indrayani College Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सुदृढ, सशक्त समाजासाठी आरोग्य, शिक्षण व्यवस्थेसोबतच नवीन उद्योग उभारणी गरजेची असते. अलीकडच्या काळात आरोग्य, शिक्षण, उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनीही काळानुरूप बदल स्वीकारून आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. नवीन संधीकडे विद्यार्थ्यांनी डोळसपणे पाहिले पाहिजे, असे मत कौस्तुभ कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

इंद्रायणी महाविद्यालयात ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे हे होते. याप्रसंगी खजिनदार शैलेश शहा, उद्योजक संजय साने, निरुपाताई कानिटकर, युवा उद्योजक रणजीत काकडे, युवराज काकडे, विलास काळोखे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. संजय आरोटे आदी उपस्थित होते. दरम्यान, संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले.

मिस्टर किम यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांनी काहीतरी साध्य करण्यासाठी वेळेचे नियोजन केले पाहिजे. ध्येय उच्च असेल, तर यशस्वी होता येते, हा संदेश देत हरियाणा, आंध्रप्रदेशसह महाराष्ट्रातील ह्युंदाईच्या यशस्वीतेचा आढावा घेतला.

रणजीत काकडे म्हणाले, की आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग उभे राहिले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी कोरियन लोकांच्या कामाच्या पद्धतीचे आत्मपरीक्षण करून त्यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला पाहिजे. प्रशांत बोरा म्हणाले, की संधीची समानता या उद्देश पत्रिकेतील शब्दांप्रमाणे संधीची वेळ ओळखता आली पाहिजे. ज्ञान हेच तुम्हाला हक्क मिळवून देणारे आहे. देशाला पुढे नेण्यासाठी ज्ञानाची ताकद पणाला लावा.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या कार्याची घोडदौड अधोरेखित केली. तसेच संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी प्रियंका इंगळे हिने नुकत्याच पार पडलेल्या खो-खो विश्वचषकचे नेतृत्व करत भारताला खो-खोमध्ये यश मिळवून दिल्याबद्दल कौतुक केले.

चंद्रकांत शेटे यांनी संस्थेतील विकासाच्या प्रगतीचा आढावा घेत सर्वांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाचा समारंभ यशस्वीपणे पार पडला. सूत्रसंचालन प्रा. आर.आर. डोके यांनी केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
– महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी
– महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी


dainik maval jahirat

Previous Post

ओवळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रेणुका वाटाणे यांची बिनविरोध निवड । Maval News

Next Post

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bhandara-Dongar-Tukaram-Maharaj-Mandir

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.