Dainik Maval News : सुदवडी येथे गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला असून महिला आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी पाऊणे पाच वाजताच्या सुमारास गावातील ओढ्याजवळ करण्यात आली.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस शिपाई श्यामसुंदर वैजनाथ गुट्टे यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पस्तीस वर्षीय महिला आरोपीविरुद्ध तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंद कायदा १९४९ चे कलम ६५ (क) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे १ लाख ५० हजार रुपयांचे तीन हजार लीटर गुळ मिश्रीत रसायन भिजत घालताना मिळून आली. पोलीस हवालदार भोजणे हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
– महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी
– महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी