व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती रद्द

राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील सदस्याच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 30, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
cm Devendra Fadnavis

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील विशेष निमंत्रित आणि नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. तात्काळ या सर्व नियुक्त्या रद्द कराव्यात असे आदेश नियोजन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्य सरकारच्या अवर सचिव सुषमा विवेक कांबळी यांनी राज्यपाल महोदय यांचा जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भातचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या निर्णय झाल्याच्या क्षणापासून रद्द करण्यात आल्या आहेत. 28 तारखेला हा जीआर प्रसिद्ध केला आहे.

  • जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या विकासासाठी निधीचे नियोजन केले जाते. नियोजन समितीच्या बैठकीत कोणाला किती निधी द्यायचा, हे ठरवले जाते. संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक होत असते. जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार हे नियोजन समितीचे सदस्य असतात. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता केवळ आमदार आणि खासदारांनाच बसता येणार आहे.

मात्र, त्यांच्या शिफारसीनुसार येणाऱ्या विशेष निमंत्रित सदस्यांना या बैठकांना उपस्थित राहता येणार नाही. नवीन नियुक्त्या होईपर्यंत सदस्यांना बैठकींना बसता येणार नाही. सरकार बदलल्यानंतर सर्व जिल्ह्यात नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या जातात. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या नियुक्ती केली जाते. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना या नियुक्त्यांमध्ये प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आता नवीन सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश येईपर्यंत इच्छुकांना वाट पहावी लागणार आहे.

काय आहे परिपत्रक?
“महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) अधिनियम, १९९८ मधील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यांसाठी “जिल्हा नियोजन समिती” गठीत करण्याची तरतुद आहे. त्यानुसार विविध जिल्ह्यांसाठी जिल्हा नियोजन समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) अधिनियम, १९९८ च्या प्रकरण दोन, कलम ३ (३) दोन (ब) आणि (क) मधील तरतुदीनुसार राज्य शासनाकडून सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीवर “नामनिर्देशित सदस्य” म्हणून नियुक्त्या करण्यात येतात. तसेच उक्त अधिनियमातील कलम ३ (३) चार (फ) मधील तरतुदीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षांशी विचार विनिमय करून राज्य शासनाकडून सर्व जिल्हा नियोजन समित्यांच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व्यक्‍तींना “विशेष निमंत्रित सदस्य” म्हणून नामनिर्देशित करण्यात येते.

महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (सभा घेणे) नियम, २०१८ मधील परिच्छेद ७ अनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समित्यांना सहाय्य करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली “कार्यकारी समिती” गठीत करण्याची तरतुद आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून विविध जिल्ह्यांच्या कार्यकारी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्हा नियोजन समित्यांवर तसेच जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समित्यांवर “नामनिर्देशित सदस्य” तसेच “विशेष निमंत्रित सदस्य” यांच्या नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत करण्यात आल्या असल्याने यापूर्वी उपरोक्त अधिनियम व नियमातील तरतुदींनुसार राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीवरील व कार्यकारी समितीवरील “नामनिर्देशित सदस्य” व “विशेष निमंत्रित सदस्य” यांच्या नियुक्त्या रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर “नामनिर्देशित सदस्य” व “विशेष निमंत्रित सदस्य” म्हणून राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या तसेच महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (सभा घेणे) (सुधारणा) नियम, २०१८ च्या अधिसुचनेतील परिच्छेद ७ (मूळ अधिनियमाचा नियम ६-अ) मधील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांच्या कार्यकारी समित्यांवर “नामनिर्देशीत सदस्यतसेच “विशेष निमंत्रित सदस्य” म्हणून शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या या शासन निर्णयान्वये त्वरीत प्रभावाने रद्द करण्यात येत आहे, असा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळच्या राजकारणात भूकंप ! विधानसभा निवडणुकीत सुनिल शेळकेंविरोधात प्रचार केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आठ दिग्गज नेत्यांचे पक्षातून निलंबन
– पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, कामशेत व लोणावळा स्थानकांवर थांबणाऱ्या जलद लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी
– वडगावची भूमी केवळ मराठा साम्राज्याचे नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत येथील अनधिकृत शाळा ‘जीजस ख्रीस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल’वर गुन्हा दाखल । Kamshet News

Next Post

गहुंजे स्टेडियमवर शुक्रवारी भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना ; वाहतूक मार्गात मोठे बदल – जाणून घ्या । IND vs ENG 4th T20 Pune Gahunje Stadium

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Cricket Association Stadium Gahunje Pune

गहुंजे स्टेडियमवर शुक्रवारी भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना ; वाहतूक मार्गात मोठे बदल - जाणून घ्या । IND vs ENG 4th T20 Pune Gahunje Stadium

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.