व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पंधरावा वित्त आयोग : ग्रामपंचायती होणार मालामाल, पाहा पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्याला किती निधी मिळणार?

पंधरावा वित्त आयोग : ग्रामपंचायती होणार मालामाल, पाहा पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्याला किती निधी मिळणार?

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 26, 2022
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा
15th-finance-commission

File Photo


पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना 2022-23 या आर्थिक वर्षाच्या निधीचा हप्ता नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत

पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 1380 ग्रामपंचायतींसाठी 58 कोटी 81 लाख 58 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात लवकरच ही रक्कम वर्ग होणार असून, आराखड्यानुसार कामेही मार्गी लागणार असल्याने गावविकासालाही चालना मिळणार आहे. ( 15th Finance Commission Gram Panchayats will be Rich see which taluka in Pune district will get how much funds )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

ग्रामविकास विभागाकडून विकास कामांसाठी ग्रामपंचायतींना 80 टक्के, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी 10-10 टक्के निधीची तरतूद केली जाते. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांना निधी वितरित केला जात आहे. त्यासाठी राज्यात 726 कोटी 41 लाख रुपयांचा निधी लागणार आहे.

15व्या केंद्रीय वित्त आयोगाकडून राज्य सरकारला आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. मात्र ज्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक आहेत, अशा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना 15व्या वित्त आयोगाचे वितरण केले जाणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला दरवर्षी मिळणारे 10-10 टक्के अनुदान प्राप्त होणार नाही. ( 15th Finance Commission Gram Panchayats will be Rich see which taluka in Pune district will get how much funds )

पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्याला किती निधी ?

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 6 कोटी 58 लाखांचा निधी हा जुन्नर तालुक्यातील 144 ग्रामपंचायतींना मिळणार आहे. तर, सर्वात कमी निधी वेल्ह्यामधील 70 ग्रामपंचायतींना 94 लाख इतका प्राप्त होणार आहे. या निधीतून गावातील मूलभूत विकास कामांसाठी खर्च करता येणार आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन, वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे जिल्हा
तालुके – 13
ग्रामपंचायती – 1380
मंजूर निधी – 58 कोटी 81 लाख 58 हजार रुपये
राज्याला मिळालेला निधी – 726 कोटी 41 लाख रुपये

तालुकानिहाय निधी (रुपयांमध्ये)

1) जुन्नर – 144 ग्रामपंचायती – 6 कोटी 58 लाख 23 हजार निधी
2) इंदापूर – 116 ग्रामपंचायती – 6 कोटी 39 लाख 56 हजार निधी
3) शिरूर – 96 ग्रामपंचायती – 6 कोटी 17 लाख 53 हजार निधी
4) खेड – 161 ग्रामपंचायती – 6 कोटी 13 लाख 70 हजार निधी
5) दौंड – 80 ग्रामपंचायती – 5 कोटी 73 लाख 29 हजार निधी
6) बारामती – 98 ग्रामपंचायती – 5 कोटी 23 लाख निधी
7) हवेली – 71 ग्रामपंचायती – 4 कोटी 57 लाख 12 हजार निधी
8) मावळ – 101 ग्रामपंचायती – 4 कोटी 39 लाख 15 हजार निधी
9) आंबेगाव – 102 ग्रामपंचायती- 3 कोटी 77 लाख 17 हजार निधी
10) पुरंदर – 93 ग्रामपंचायती – 3 कोटी 34 लाख 47 हजार निधी
11) भोर – 156 ग्रामपंचायती – 2 कोटी 93 लाख 48 हजार निधी
12) मुळशी – 92 ग्रामपंचायती – 2 कोटी 60 लाख 88 हजार निधी
13) वेल्हे – 70 ग्रामपंचायती – 94 लाख निधी

एकूण – 1380 ग्रामपंचायती – 58 कोटी 81 लाख 58 हजार निधी

अधिक वाचा – 

– शिळींब ते घुसळखांब रस्ता, आंबेगाव ते दुधिवरे खिंड रस्ता आदी विकासकामांबाबत आढावा बैठक
– कुटुंबातील कुणी कर्जदार व्यक्ती कोरोनाने गेला असल्यास ही बातमी नक्की वाचा, सहकार विभागाचा दिलासादायक निर्णय
– सोशल मीडियाचा नाद लईच बेक्कार..! रेल्वे रुळावर झोपून फोटो-व्हिडिओ काढणाऱ्या तरुणांना अटक, देहूरोड-शेलारवाडी दरम्यानची घटना


Previous Post

सोशल मीडियाचा नाद लईच बेक्कार..! रेल्वे रुळावर झोपून फोटो-व्हिडिओ काढणाऱ्या तरुणांना अटक, देहूरोड-शेलारवाडी दरम्यानची घटना

Next Post

गाव तसं चांगलंच..! सरपंच पदाच्या निवडणूकीत 1 मताने हरला उमेदवार; गावाने 11 लाख, 1 कार आणि जमीन देऊन केला सत्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat

गाव तसं चांगलंच..! सरपंच पदाच्या निवडणूकीत 1 मताने हरला उमेदवार; गावाने 11 लाख, 1 कार आणि जमीन देऊन केला सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dharmaveer Balidan Mas observed by Shambhu devotees in villages of Maval taluka

मावळ तालुक्यातील गावागावांत शंभूभक्तांकडून ‘धर्मवीर बलिदान मास’चे पालन

March 17, 2026
The equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj was inaugurated in Malwandi Thule

मळवंडी ठुले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमाखात उद्घाटन

March 17, 2026
Caste certificates were distributed to 95 tribal citizens under Adim Seva Abhiyan at Shilimb through MLA Sunil Shelke

आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप

March 17, 2026
Dnyaneshwari lost her life due to mistake by tempo driver transporting gas cylinders incident at Somatane Phata Maval

गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना

March 17, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

March 17, 2026
Major changes in traffic in Dehugaon area on occasion of Sant Tukaram Maharaj Bij ceremony

स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वाहतूक बदल

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.