व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात ‘जीबीएस’ आजाराचा फैलाव नाही, मात्र नागरिकांनी ‘ही’ काळजी जरूर घ्यावी । Maval News

मावळ तालुक्यात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रूग्ण आढळून आलेले नाहीत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 13, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
GBS disease

File Image


Dainik Maval News : मावळ तालुक्यात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रूग्ण आढळून आलेले नाहीत. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शॅरन सोनवणे यांनी केले आहे.

Novel NIBR Ads

पुणे जिल्ह्यात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शॅरन सोनवणे यांनी मावळ तालुक्‍यात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून गावात जनजागृती करून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • जीबीएस बाबत अफवा पसरविणे टाळावे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला जीबीएसची लक्षणे आढळली तर ताबडतोब नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ सोनावणे यांनी केले आहे.

या उपाययोजना करा
1. पाणी उकळून प्यावे
2. भाज्या आणि फळे पूर्णपणे धुवून घ्याव्यात
3. मांस व्यवस्थित शिजवा. कच्चे किंवा कमी शिजलेले अन्न, विशेषतः अंडी आणि समुद्री खाद्यपदार्थ टाळावे
4. खाण्यापूर्वी आणि स्वच्छतागृहाचा वापरल्यानंतर साबण व पाण्याने हात धुवावा.
5. कच्चे आणि शिजविलेले अन्न वेगळे ठेवा. कच्चे मांस हाताळल्यानंतर स्वयंपाक घरातील पृष्ठभाग आणि भांडी
निर्जंतुक करावा
6. पाय किंवा हातांमध्ये अचानक कमजोरी. चालण्यास त्रास होणे किंवा सुन्न होणे. सततचा अतिसार विशेषतः जर रक्ताळलेला असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

जीबीएस आजाराचा मवाळ तालुक्यात अद्याप प्रादुर्भाव झालेला नाही. हा बरा होणारा आजार असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. – कुलदीप प्रधान, प्रशासक तथा गटविकास अधिकारी, मावळ पंचायत समिती

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ


dainik maval jahirat

Previous Post

एलआयसी काढण्याच्या बहाण्याने एकाची 2 लाखाची फसवणूक, तळेगाव दाभाडे येथील प्रकार । Talegaon Dabhade

Next Post

गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मावळात प्रथमच ‘हौसिंग दरबार’ कार्यक्रमाचे आयोजन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Housing Darbar program organized in Maval to understand problems of housing organizations Society

गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मावळात प्रथमच 'हौसिंग दरबार' कार्यक्रमाचे आयोजन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.