व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पवना कृषक’ची निवडणूक अखेर स्थगित, नवीन निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार । Maval News

रविवारी (दि. २३ फेब्रुवारी) होणाऱ्या पवना कृषक सहकारी संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी राकेश निखारे यांनी दिली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 14, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Pavana Krishak Seva Sahakari Sanstha

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवना कृषक सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या एका उमेदवाराचे बुधवारी (दि.१२) निधन झाले. यामुळे रविवारी (दि. २३ फेब्रुवारी) होणाऱ्या पवना कृषक सहकारी संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी राकेश निखारे यांनी दिली आहे.

मंजूर निवडणूक कार्यक्रमानुसार ह्या निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक १६ जानेवारी रोजी सुरू झाला. यात १० फेब्रुवारी रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी सर्वसाधारण गटातून रमेश गणपत माळवदकर यांचे नाव अंतिम उमेदवारांच्या यादीमध्ये समाविष्ठ होते. दरम्यान, सर्वसाधारण खातेदार कर्जदार मतदारसंघातील उमेदवार रमेश गणपत माळवदकर यांचे बुधवारी (दि.१२) आकस्मिक निधन झाले. याबाबत ग्रामपंचायत शिवणे यांच्याकडील मृत्यू प्रमाणपत्र निवडणूक अधिकारी यांना प्राप्त झाले आहे.

  • महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) २०१४ मधील नियम ३१ प्रमाणे असलेल्या तरतूदीनुसार, मतदानपुर्वी एखादा उमेदवार मरण पावला तर निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवडणूक स्थगित करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार, पवना कृषक निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी राकेश निखारे यांनी माळवदकर यांच्या मृत्यूबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला असून पवना कृषक सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे, तसेच नवीन निडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर करणार असल्याचे निखारे यांनी सांगितले आहे.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणुकीची नवीन तारीख घोषित करून निवडणुकीच्या संदर्भातील सर्व कामकाजास नव्याने प्रारंभ करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या इतर सर्व उमेदवारांचे अर्ज कायम राहतील. त्यांना नव्याने अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याची नोटीस दिली असेल. त्यांना पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. तसेच सध्या जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत, त्यांना आता नवीन प्रक्रियेत अर्ज मागे घेता येणार नाहीत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निखारे यांनी दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ


dainik maval jahirat

Previous Post

कौतुकास्पद ! बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा ; आमदार शेळकेंच्या पुढाकारातून ४६ गावांमधील २५०० विद्यार्थ्यांना सुविधा

Next Post

सेवा रस्त्यालगतच्या व्यवसायिकांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा ; रस्त्यात वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Obstruction of traffic due to vehicles of traders along service road at kamshet

सेवा रस्त्यालगतच्या व्यवसायिकांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा ; रस्त्यात वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
Water-shut-off

वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.