व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

छत्रपती शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना नामांकन ! ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 25, 2025
in देश-विदेश, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा
Forts-In-Maharashtra

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे. वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांना शिष्टमंडळ भेटले. महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या शर्मा यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपले महाराज राजे शिवछत्रपती यांच्या 12 गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहे, असे मंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आज पॅरिसला गेले आहे.

महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. याबाबतचे सादरीकरण पूर्ण क्षमतेने प्रभावीपणे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ गेले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचा राज्य शासनाचा प्रस्ताव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोकडे पाठवला, त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे व सादरीकरणासाठी जाण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मंत्री ॲड.शेलार यांनी आभार मानले आहेत. या प्रस्तावाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ २२ ते २६ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे गेले आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.शेलार करणार आहेत. इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे.

या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारे, या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास, या किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशाचे महत्व आणि जतन सुनिश्चित होईल, अशी आशा ॲड.आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


Previous Post

नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 3 हजार रुपये वाढविणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Next Post

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत ; 10 मार्च रोजी अर्थसंकल्प

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत ; 10 मार्च रोजी अर्थसंकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.