व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 22, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील 145 महिलांना मोफत जीडीए नर्सिंग कोर्सचे प्रशिक्षण । Lonavala News

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी (SBU) कान्हेच्या CSR निधी अंतर्गत जनरल ड्युटी असिस्टंट (GDA) नर्सिंग असिस्टंट कोर्स च्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन 24 फेब्रुवारी रोजी लोणावळ्यातील महिला मंडळ हॉल येथे करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 28, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Free GDA nursing course training for 145 women in Lonavala and Maval areas

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी (SBU) कान्हेच्या CSR निधी अंतर्गत जनरल ड्युटी असिस्टंट (GDA) नर्सिंग असिस्टंट कोर्स च्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन 24 फेब्रुवारी रोजी लोणावळ्यातील महिला मंडळ हॉल येथे करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ लोणावळा व परिसरातील 104 आणि कान्हे व पंचक्रोशीतील 41 अशा एकूण 145 विद्यार्थिनींनी घेतला. हा सहा महिन्यांचा कोर्स NSDC व स्किल इंडिया यांच्या अभ्यासक्रमावर आधारित होता.

महत्त्वाचे योगदान आणि प्रशिक्षण
या उपक्रमात डाॅ. सीमा शिंदे (प्रोजेक्ट हेड GDA) आणि डाॅ. कविता कचरे (प्रॅक्टिकल प्रमुख) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. विद्यार्थिनींना सरकारी अभ्यासक्रमासह सामान्य आजार, स्त्री रोग, प्रसूती, ऑपरेशन थिएटर काळजी यासारख्या आरोग्यविषयक प्रशिक्षणांचे मार्गदर्शन मिळाले. महिलांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेऊन आर्थिक स्वावलंबन मिळवावे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता, जो यशस्वीपणे साध्य झाला.

कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला मंडळ अध्यक्षा मनिषा बंबोरी व कार्यकारिणीने सभागृह उपलब्ध करून दिले. सुनिता इंगुलकर (PRO, अथर्व येवले सोशल फाऊंडेशन) यांनी संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली. तसेच, विविध प्रतिष्ठित डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रॅक्टिकल प्रशिक्षणासाठी सहकार्य केले. या उपक्रमासाठी कान्हे ग्रामपंचायत सरपंच विजय सातकर, सीमा वर्तक, स्वाती ताकदूंदे मॅडम, महाडिक सिस्टर, महाजन सिस्टर, डॉ. नीलम दिक्षित (औध सरकारी हॉस्पिटल, स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ), डॉ. शैलेश शहा (श्रद्धा हॉस्पिटल), डॉ. वर्षा पाटील व डॉ. पाटील आणि संपूर्ण स्टाफ (कान्हे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय), डॉ. भाग्यश्री पाटील, आशा वर्कर्स आणि शंखेश्वर हॉस्पिटल स्टाफ लोणावळा यांसह अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी विद्यार्थिनींच्या प्रशिक्षणाला मोलाचे योगदान दिले.

प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम प्रमुख उपस्थिती
या सोहळ्यास माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा महिला मंडळ अध्यक्षा मनिषा बंबोरी, माजी नगरसेवक दत्तात्रय येवले, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा उमा मेहता, आरोही तळेगावकर, महिंद्रा कंपनीचे प्लांट हेड आशिष कौर, ऑपरेशन हेड साहिल जैन, प्रभाकरन अखर, सुशील नंबिय, सुरेंद्र नेवासकर, रोहित तिकोणे आदी मान्यवर उपस्थित होते.

tata tiago ads may 2025

विशेष कार्यक्रम आणि पारितोषिके
विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांसोबत पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि चार्ट तयार करणे स्पर्धा यामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली. आदर्श विद्यार्थिनी सन्मान कु. श्रावणी अबू चौधरी आणि मेघा शिळवणे यांना प्रदान करण्यात आला. प्रतीक भालके (MSW), मनिषा बांदल आणि टीम यांनी सरकारी योजनांबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया येवले (संस्थापक अध्यक्षा, अथर्व येवले सोशल फाऊंडेशन) यांनी केले, तर माफोई फाऊंडेशन चेन्नईचे व्यंकटेश राव यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय अथर्व येवले सोशल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विजय येवले यांनी करून दिला. सुनीता इंगुलकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा 


dainik maval ads may 2025

Previous Post

कारवाईचा इशारा मिळताच लोणावळा शहरातील टपरी संघटना आक्रमक ; रस्त्यावर उतरण्याचा निर्धार । Lonavala News

Next Post

देहूत अफूची शेती, सव्वा तीन लाख किमतीची झाडे जप्त, शेतकऱ्याला अटक । Dehu News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Cultivation of opium in Dehu areas plants worth three lakhs seized farmer arrested

देहूत अफूची शेती, सव्वा तीन लाख किमतीची झाडे जप्त, शेतकऱ्याला अटक । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pune-Ring-Road

पुणे रिंगरोडसाठी ‘एमएसआरडीसी’चा मास्टर प्लॅन ; काम रखडल्यास कंपन्यांना ठोठावणार भला मोठ्ठा दंड । Pune Ring Road

June 22, 2025
District Collector Jitendra Dudi reviewed the functioning of Pune District Disaster Management Authority

निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे ३१ जुलैपूर्वी सुरू करावीत – जिल्हाधिकारी

June 22, 2025
File cases against those blocking natural drains in Hinjewadi MP Shrirang Barne instructions to officials

हिंजवडीतील नैसर्गिक नाले बांधकाम व्यावसायिक, कंपनी मालकांनी बुजविले ; ‘नैसर्गिक नाले बुजविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’

June 22, 2025
Sub-Divisional Agriculture Officer Sunil Jadhav reviews preparations for Kharif season in Maval

उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून मावळमधील खरीप हंगामातील तयारीचा आढावा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन । Maval News

June 22, 2025
Departure of Shri Potoba Maharaj Dindi from Vadgaon Maval to Pandharpur

वडगाव मावळ येथून श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान । Vadgaon Maval

June 22, 2025
Thousands of students took yoga lessons simultaneously at Pavana Education Complex in Pavananagar

पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलात एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे । Pavananagar News

June 22, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.