व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उर्से टोलनाक्याजवळ पकडलेले रक्तचंदन तब्बल 9 कोटींचे, दोन जण ताब्यात – वाचा संपूर्ण घटनाक्रम । Pune News

पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वरील उर्से टोल नाक्याजवळ रविवारी (दि.2) सायंकाळी रक्तचंदनाची तस्करी करणारा कंटेनर पकडण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 4, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Red sandalwood worth Rs 9 crore seized near Urse toll plaza on Mumbai Pune Expressway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्राच्या बाहेरून हजारो किलोमीटर अन शेकडो चेकपोस्ट पार करत पिंपरी-चिंचवड मार्गे नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे नेण्यात येणारे 9 कोटींचे रक्त चंदन पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पकडले.

पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वरील उर्से टोल नाक्याजवळ रविवारी (दि.2) सायंकाळी रक्तचंदनाची तस्करी करणारा कंटेनर पकडण्यात आला. यात रक्तचंदनाची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेऊन सुमारे 9 कोटी रुपये किमतीचे रक्तचंदन जप्त करण्यात आले.

  • शिरगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303 (2), 3 (5), भारतीय वन अधिनियम, महाराष्ट्र खासगी वृक्षतोड अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजाराम गंगाराम गायखे (वय 37 वर्षे रा. काळेवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), हरप्रितसिंग धरमसिंग बदाना (वय 42 वर्षे रा. विराज रेसिडेन्सी वेस्ट ठाणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस उप आयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे पिंपरी चिचवड आयुक्तलाच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलीस फौजदार महेश खांडे व पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पुणे मुबंई एक्सप्रेस वे वरती एमएच/43/वाय/0742 या कंटेनरमध्ये अवैधरित्या मालाची वाहतुक होत आहे.

त्यानंतर मालमत्ता विरोधी पथकाच्या टीमने पुणे मुबंई एक्सप्रेस वे वर शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना ऊर्से टोलनाक्या जवळ सापळा रचुन शिताफिने एमएच/43/वाय/0742 हा कंटेनर ताब्यात घेतला. यावेळी कंटेनरमध्ये 11 टन 490 किलोग्रॅम वजनाचे 8 कोटी 61 लाख 75 हजार रुपये किंमतीचे रक्तचंदनाच्या लाकडांचे ओडके मिळून आले.

सदर उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, आशिष बनकर, नितीन लोखंडे, पोलीस हवालदार गडदे, पोलीस नाईक गणेश कोकणे, अमर कदम, हर्षद कदम, अमोल गोरे, मोहसीन आत्तार यांनी केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक


dainik maval jahirat

Previous Post

शनिवार असो की रविवार, देहू नगरपंचायत कार्यालय सुरू राहणार ; कर वसुलीसाठी नगरपंचायतीचा निर्णय । Dehu News

Next Post

धक्कादायक : चाकणमध्ये पोलीस व दरोडेखोरांमध्ये चकमक, डीसीपीच्या छातीवर चालवला कोयता, एपीआयच्या खांद्यावर वार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Encounter between police and robbers in Chakan Pune

धक्कादायक : चाकणमध्ये पोलीस व दरोडेखोरांमध्ये चकमक, डीसीपीच्या छातीवर चालवला कोयता, एपीआयच्या खांद्यावर वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
Water-shut-off

वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.