व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 30 लाखांच्या घरात आहे. शहरातील वाढते नागरीकरण आणि पाण्याची मागणी याचा विचार करता भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 6, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Demand for reservation of water from Mulshi Dam for Pimpri-Chinchwad city

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पिंपरी – चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या व भविष्यकाळातील पाण्याची गरज लक्षात घेता शहरासाठी मुळशी धरणातून पाणी आरक्षणाला मंजुरी देण्याबाबत सरकारने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

  • महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची आमदार लांडगे यांनी मुंबईत भेट घेतली. यावेळी पिंपरी-चिंचवडचा पाणी पुरवठा आणि नवीन जलस्त्रोत निर्मिती याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्र दिले आहे.

पत्रात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 30 लाखांच्या घरात आहे. शहरातील वाढते नागरीकरण आणि पाण्याची मागणी याचा विचार करता भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त जलस्त्रोत निर्माण करण्याची नितांत आवश्यकता असून, मुळशी धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी पाणी आरक्षीत करावे, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने राज्य शासनाला पाठवला आहे.

दरम्यान, पुण्यात कालवा समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक आमदारांनी पुण्यासाठी मुळशी धरणातून पाणी आरक्षणाबाबत मागणी केली आहे. त्यासंदर्भात कालवा समितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्याला अनुसरून, पिंपरी-चिंचवडसाठीसुद्धा मुळशी धरणातून पाणी आरक्षीत व्हावे, याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती आमदार लांडगे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला सध्या पवना धरण आणि आंद्रा, भामा- आसखेड धरणातून पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प अद्याप सुरू नाही. तसेच, आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाचा दुसरा टप्पा अद्याप कार्यान्वयीत झालेला नाही. सबब, शहरातील पाण्याची मागणी आणि पुरवठा याचे प्रमाण व्यस्त असून, सोसायटीधारकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. परिणामी, पाणी पुरवठा आणि टंचाई ही समस्या संवेदनशील बनली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक


Previous Post

देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News

Next Post

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लूटले ; तळेगाव एमआयडीसी ठाणे हद्दीतील घटना

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Elderly woman robbed of gold ornaments on pretext of asking for address Incident in Talegaon MIDC area

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लूटले ; तळेगाव एमआयडीसी ठाणे हद्दीतील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.