व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुर्दैवी घटना : आंदर मावळातील गोशाळेत भीषण आग, आगीत तीन गायींचा होरपळून मृत्यू, तीन गायी जखमी । Maval News

मावळ तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळच्या आंदर मावळ विभागातील माऊ हद्दीतील दवणेवाडी येथे असणाऱ्या एका गोशाळेला गुरुवारी (दि.६) दुपारच्या सुमारास भीषण आग लागली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 6, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Three cows died and three were injured in massive fire broke out in cowshed in Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळच्या आंदर मावळ विभागातील माऊ हद्दीतील दवणेवाडी येथे असणाऱ्या एका गोशाळेला गुरुवारी (दि.६) दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या आगीत गोशाळेतील तीन मोठ्या गायी होरपळून मृत पावल्या आहेत. तर अन्य तीन गायी भाजल्याने जखमी झाल्या आहेत.

दवणेवाडी, माऊ येथील ब्रह्म प्रतिष्ठान संचलित गोशाळेत गुरुवारी दुपारच्या सुमारास आकस्मिक आग लागली. आग लागली तेव्हा गोशाळेत एकून १९ जनावरे होती. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारणे केले. भीषण आगीत गोशाळेतील तीन गायींचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य तीन गायी जखमी झाल्या आहेत. जखमी गायींवर पशूवैद्यकीय विभागामार्फत उपचार सुरू आहेत.

  • गोशाळेत आग लागल्याचे समजताच तळेगाव एमआयडीसी, वडगाव नगरपंचायत व पीएमआरडीए येथील अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीचे स्वरूप प्रचंड असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास वेळ लागला. अखेर अथक प्रयत्नांनी दुपारी चार वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, ब्रह्म प्रतिष्ठान संचलित ह्या गोशाळेत एकूण १९ जनावरे होती. त्यातील ३ गायी गुरुवारी लागलेल्या आगीत मृत पावल्या आहेत. मागील सहा वर्षांपासून सुभाष नारायण देशपांडे हे ही गोशाळा चालवित आहेत. गोशाळेस आग कशामुळे लागली हे समजले नसून देशपांडे यांनी शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

  • घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी विजय चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी विजय दिमते यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेचा पंचनामा केला. गोशाळेतील गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तीन गायींवर उपचार सुरु आहेत, बाकी जनावरे सुखरूप आहेत. पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. गोशाळेस आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तलाठी चव्हाण यांनी सांगितले.

अग्निशमन दलाचे शंकर वसंतराव पाटील, विशाल चव्हाण, सचिन साळुंखे, मंगेश डावखर, संजय गायकवाड, विनायक नांगरे, अजय चव्हाण यांसह पथकातील अन्य जवान, ग्रामस्थ सर्वांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ; संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे यथोचित स्मारक उभारणार

Next Post

चाकण-तळेगाव रोडवर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

चाकण-तळेगाव रोडवर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.