व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा ; मावळ तालुका सकल मराठा समाजाची मागणी

निवेदनात म्हटले आहे की, राज्यभर हादरवून सोडलेल्या सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील काही गोष्टी काल प्रसार माध्यमातून पुढे आल्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 8, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Make Dhananjay Munde a co-accused in Massajog sarpanch murder case demand by Maratha samaj

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून आरोपींनी त्यांना केलेल्या अमानुष मारहाणीचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे अशी मागणी मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.

  • निवेदनात म्हटले आहे की, राज्यभर हादरवून सोडलेल्या सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील काही गोष्टी काल प्रसार माध्यमातून पुढे आल्या. अतिशय अमानवी, क्रूर पद्धतीने खून झालेल्या मत्साजोग गावचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांनी हत्या करतानाचे व्हिडिओ आणि फोटो प्रसार माध्यमातून समोर आले. क्रौर्याची परिसीमा गाठत केलेले कृत्य भयाण असून संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांनी हत्या केली हे समोर आले असून देखील हत्येतील आरोपी वाल्मिक कराड माझ्या जवळचा माणूस असे म्हणत त्याला पाठीशी घालणाऱ्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून विधीमंडळ सदस्याचा राजीनामा दिला नाही, त्यामुळे जनतेची आणि अखंड मराठा समाजाची भावना तीव्र आहे.

त्याला पाठीशी घालणाऱ्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा तातडीने विधीमंडळ सदस्याचा राजीनामा घेण्यात यावा. त्याचे व त्याच्याशी संबंधित सर्वांचे सीडीआर तपासून आरोपींना मदत केल्याचे सिद्ध होत असल्यास त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी. मुख्य आरोपी वाल्मिक कराड सह धनंजय मुंडे पास सह आरोपी करण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.

बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले. संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे फोटो देखील आता समोर आले आहेत. या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्यामुळे त्यांच्यावर देखील आरोप करण्यात आले.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील, भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे. मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला असून त्यावरील कार्यवाहीसाठी तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मात्र फक्त राजीनामा नाहीतर धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी राज्यभरातून केली जात आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

40-45 वय झालेल्या कामगारांनी जायचं कुठं? आमदार शेळकेंकडून सभागृहात जनरल मोटर्सच्या कामगारांचा मुद्दा उपस्थित

Next Post

चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अयशस्वी । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Woman injured in container accident on Chakan-Shikrapur road dies daughter dies earlier

चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अयशस्वी । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.