व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अयशस्वी । Pune News

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर एका कंटेनर चालकाने बेदकारपणे वाहन चालवित जवळपास 10 ते 12 वाहनांना धडक दिली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 8, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Woman injured in container accident on Chakan-Shikrapur road dies daughter dies earlier

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : चाकण-शिक्रापूर रस्त्यावर एका कंटेनर चालकाने बेदकारपणे वाहन चालवित जवळपास 10 ते 12 वाहनांना धडक दिली होती. 16 जानेवारी 2025 रोजी घडलेल्या या अपघातात जखमी झालेल्या एका लहान मुलीचा 23 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्या मुलीच्या आईचा देखील उपचारादरम्यान मंगळवारी (दि.4) मृत्यू झाला. तब्बल 46 दिवस सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.

पौर्णिमा अंबादास गाढवे (वय 29, रा. रासे, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर पिंपरीतील एक खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

  • उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास पौर्णिमा यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे चाकण येथील कंटेनर अपघातातील मृतांची संख्या आता दोन झाली आहे. अपघातानंतर आठ दिवसांनी म्हणजे 23 जानेवारी रोजी पौर्णिमा यांची 9 वर्षीय मुलगी धनश्री अंबादास गाढवे हिचा पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अपघातात जखमी पौर्णिमा यांची प्रकृती सुरुवातीपासून गंभीर होती. एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

आरोपी कंटेनरचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत अनेक वाहनांना धडक दिली. तसेच, पोलिसांच्या गाडीलाही धडक देत पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याशिवाय शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कंटेनरचालकाला बेदम मारहाण केली होती. पुण्यात ससून रुग्णालयात त्याला दाखल केले होते. रुग्णालयातून सुटका होताच पोलिसांनी त्याला अटक केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा ; मावळ तालुका सकल मराठा समाजाची मागणी

Next Post

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chemotherapy facilities will be made available in all district hospitals in maharashtra state

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.