व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरण जलाशयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची कबुली । Maval News

खडकवासला आणि पवना धरण या जलाशयांच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे झाल्याची कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 9, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Pavana-Dam-Maval-Taluka

Photo Courtesy : Fie Photo / Pavana Dam


Dainik Maval News : खडकवासला आणि पवना धरण या जलाशयांच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे झाल्याची कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. अतिक्रमण करणाऱ्यांना वेळोवेळी नोटिसा बजाविण्यात आल्या असून, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून अतिक्रमणे काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही विखे-पाटील यांनी सांगितले.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार राजेश राठोड, अशोक उर्फ भाई जगताप, अभिजित वंजारी, डाॅ. प्रज्ञा सातव, धीरज लिंगाडे यांनी विधानपरिषदेमध्ये खडकवासला व पवना धरण परिसरातील अतिक्रमणांचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना विखे पाटील यांनी ही कबुली दिली. ( Encroachments in restricted area of Pavana Dam Reservoir Maval said Minister Radhakrishna Vikhe-Patil )

  • खडकवासला, पवना या धरणांच्या जलाशयांच्या क्षेत्रातील जलसंपदा विभागाच्या सुमारे एक हजार एकर जमिनीवर अतिक्रमण झाले असून दोन्ही धरणांच्या अतिक्रमण केलेल्या जागांवर पाचशेहून अधिक बंगले, लाॅन, रिसाॅर्ट उभारण्यात आले आहेत. तसेच भराव घालून बेकायदा जमीन हस्तगत करण्यात आली आहे. त्यामुळे धरमातील पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली असून जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे का, आणि जलाशयांच्या क्षेत्रातील अतिक्रमणे काढण्यासाठी जलसंपदा विभागाने कोणती कारवाई केली आहे, अशी विचारणा आमदारांनी केली होती.

त्यावर उत्तर देताना, ‘खडकवासला आणि पवना धरणाच्या जलाशयांच्या बुडीत क्षेत्रात आणि जलसंपदा विभागाच्या हद्दीत कोणतीही बांधकामे झालेली नाहीत. मात्र, जलाशायंच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधितांना वेळोवेळी रितसर नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे,’ असे विखे-पाटील यांनी सांगितले.

पाण्याखालील क्षेत्रात अतिक्रमणे नाहीत
खडकवासला व पवना धरणाच्या पाण्याखालील क्षेत्रात अतिक्रमणे झालेली नाहीत. धरणांमधील पाणी साठवण कमी झाली नसून जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. धरण व कालव्यांच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणांसंदर्भात महसूल आणि वन विभागा, गृह विभाग आणि महापालिकेने संयुक्त कारवाई करावी, अशी सूचना यापूर्वीच संबंधित यंत्रणांना देण्यात आली आहे. धरण जलायशाच्या बाजूने असणाऱ्या अतिक्रमणांना नोटीस बजाविण्यात आली असून काही अतिक्रमणे काढून टाकण्यात आली आहेत. उर्वरीत अतिक्रमणेही काढून टाकण्यात येतील, असे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक महिला दिन : अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार ; योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री
– पवना धरण जलाशयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची कबुली । Maval News
– चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अयशस्वी । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

जागतिक महिला दिन : अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार ; योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री

Next Post

संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bhandara Dongar Dehu

संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.