व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत प्रस्तावित इनर रिंग रोड प्रकल्पाला वेग देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 16, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर, शहर
Pune-Ring-Road

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत प्रस्तावित इनर रिंग रोड प्रकल्पाला वेग देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या रिंग रोडसाठी 13 गावांतील 115 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. हा रिंग रोड पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत करणार असून, एकूण 83 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 42,200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पीएमआरडीए ने अंतर्गत रिंग रोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया जलद करण्यासाठी 113 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातील 30 टक्के रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संयुक्त सर्वेक्षण आणि जमिनीचे मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. या रिंग रोडसाठी खेड, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातील एकूण 44 गावांतील 743.41 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत 42 जोड रस्ते, 17 पूल आणि 10 बोगदे तयार केले जाणार असून, भविष्यातील मेट्रोसाठी 5 मीटर रुंदीची जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहे.

  • रिंग रोडचा पहिला टप्पा सोलू ते वडगाव शिंदे असा असून यामुळे नगर रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होणार आहे. या टप्प्यातील रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बाह्य रिंग रोडला जोडला जाणार आहे. तसेच, आळंदी ते वाघोली या 6.5 किलोमीटर लांबीच्या भागासाठीही भूसंपादन सुरू झाले आहे.

या प्रकल्पाचा 5.7 किलोमीटर लांबीचा भाग पुणे महानगरपालिका हद्दीत येतो. हा रस्ता लोहगावमधून जाईल आणि पिंपरी-चिंचवड शहराशी जोडला जाणार आहे. हा भाग पुणे महापालिकेकडून विकसित करून नंतर पीएमआरडीए कडे हस्तांतरित केला जाणार आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

  • बाह्य रिंग रोडची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी 15 नवीन इंटरचेंज उभारण्यात येणार आहेत, ज्यासाठी 145 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील 12 इंटरचेंज आधीच अस्तित्वात आहेत, तर 3 इंटरचेंज नव्याने उभारले जातील. हे इंटरचेंज मावळ, खेड, शिरूर, हवेली, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा आणि मुळशी या नऊ तालुक्यांमधून जाणार आहेत.

भूसंपादनासाठी समाविष्ट गावांची यादी
वडाचीवाडी, भिलारेवाडी, पिसोळी, येवलेवाडी, मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, निगरुडी, कदम वाकवस्ती, सोलू आणि वडगाव शिंदे.
पीएमआरडीए अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असून लवकरच मोजणी पूर्ण करून भूसंपादनाची प्रक्रिया पुढे नेली जाईल.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News


Previous Post

धुळवड सणाला गालबोट ; इंद्रायणी नदीत बुडून 3 तरुणांचा मृत्यू । Dehu Road News

Next Post

गणेश मूर्तिकार बेरोजगार होणार नाहीत, ‘पीओपी’ मूर्तीसंदर्भात समिती स्थापन ; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Committee formed regarding POP Ganesh idols Information from CM Devendra Fadnavis

गणेश मूर्तिकार बेरोजगार होणार नाहीत, ‘पीओपी’ मूर्तीसंदर्भात समिती स्थापन ; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.