व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशकोत्तर अमृत महोत्सव 375 वर्षपूर्ती सांगता अर्थात 376 वा बीज सोहळा रविवारी (दि.16 मार्च) श्रीक्षेत्र देहू येथे अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 16, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Sant Tukaram Maharaj Bij ceremony 2025 concluded with enthusiasm in Dehu Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशकोत्तर अमृत महोत्सव 375 वर्षपूर्ती सांगता अर्थात 376 वा बीज सोहळा रविवारी (दि.16 मार्च) श्रीक्षेत्र देहू येथे अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. देशभरातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी बीज सोहळ्यात सहभागी होत संत तुकाराम महाराज चरणी नतमस्तक होऊन समाधान व्यक्त केले.

फाल्गुन वद्य द्वितीया सदेह वैकुंठगमन दिन अर्थात बीज सोहळ्यासाठी रविवारी गोपाळपूरा येथील वैकुंठगमन मंदिराच्या आवारात दुपारी सव्वा बारा वाजता राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो भाविक भक्त, भाविकांनी मनोभावे अभिवादन करीत नांदुरकीच्या वृक्षावर बुक्का, तुळशी -पानफुले उधळण करीत हा सोहळा पहायला मिळाल्याने जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त करीत माघारी फिरले.

  • श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात व बीज सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमाला पहाटे तीन वाजल्यापासून काकड आरतीने सुरुवात झाली. श्री वैकुंठगमण मंदिरातील श्री संत तुकाराम महाराजांची महापूजा करण्यात आली. सकाळी मंदिरातील सर्व विधीवत पूजा उरकल्यानंतर सकाळी पावणे अकराच्या सुमारास “पुंडलिका वरदा हरि विठ्ठल” नामाचा जयघोष करीत पालखी मुख्य मंदिराच्या महाद्वारातून बाहेर पडली व मोठ्या लवाजम्यासह पालखीचे मुख्यमंदिरातून वैकुंठगमण मंदिराकडे प्रस्थान झाले.

पालखी बाराच्या सुमारास वैकुंठगमन मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालून येथील नांदुरकीच्या वृक्षाखालीआली. येथे देहूकर महाराज यांचे श्री संत तुकाराम महाराजांच्या वैंकुठगमण प्रसंगावरील घोटवीन लाळ, ब्रम्हज्ञानी हाती । मुक्त आत्मस्थिती सोडविन ।। या अभंगावर कीर्तन सुरू होते. कीर्तन संपल्यावर दुपारी सव्वाबारा वाजता “बोला पुंडलिका वरदा हरि विठ्ठल” असा हरिनामाचा व श्री संत तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर करीत भाविकांनी नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली. हरिनामाचा गजर झाल्या बरोबर भाविकांनी दोन्ही हात जोडून महाराजांचे सदेह वैकुठगमण प्रसंगाची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.

  • मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे परतली. यावेळी हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. बीजोत्सोव सोहळा पार पडल्यानंतर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
श्रीक्षेत्र भंडारा डोंगर देवस्थानच्या वतीने तीर्थक्षेत्र देहूतील मुख्य मंदिर, वैकुंठगमन मंदिर, गाथा मंदिर, संत तुकोबारायांचे ध्यान ठिकाण असणारे भामचंद्र डोंगर, घोरावडेश्वर डोंगर आणि भंडारा डोंगर या ठिकाणी हेलिकॉप्टरने तीन फेऱ्या पूर्ण करीत पुष्पवृष्टी करण्यात आली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News


Previous Post

एकनाथ शिंदे यांना ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार’ ; सर्व शाळांमध्ये तुकोबारायांची गाथा ई-बुक स्वरूपात उपलब्ध करणार

Next Post

लोणावळ्यात आज लोकशाही दिनाचे आयोजन, ‘या’ ठिकाणी होणार कार्यक्रम । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lokshahi Din

लोणावळ्यात आज लोकशाही दिनाचे आयोजन, 'या' ठिकाणी होणार कार्यक्रम । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.