Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ५ शाळांना पटसंख्येतील त्रुटीबाबत कळविण्यात आले होते. त्रृटी पूर्ण करण्यासाठी दिलेल्या मुदतीत सबंधित शाळांनी त्रुटी पुर्ण केल्यामुळे त्यांना अनुदानाचा टप्पा वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
- आमदार जयंत आसगावकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री भुसे विधानपरिषदेत बोलत होते. यावेळी सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
शाळांच्या अनुदानाच्या बाबत सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणास मागील प्रभावाने लागू करणे शक्य नसल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले की, तसेच शाळांच्या पटतपासणीमध्ये जाणीवपूर्वक कोणी चूक केली असेल तर त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
विहित कालावधीत त्रूटी पुर्ण करणाऱ्या शाळांना 20 टक्के वाढीव अनुदान अनुज्ञेय करण्यात आल्याची माहितीही मंत्री भुसे यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान