व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 57 हजार किलो गोमांस पकडले ; दोन कंटेनर घेतले ताब्यात । Lonavala News

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 25 मार्च रोजी रात्री बाराच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक्स्प्रेस वेवर दोन संशयित कंटेनर ताब्यात घेतले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 1, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Lonavala-Gramin-Police

File Photo : Lonavla Gramin


Dainik Maval News : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 25 मार्च रोजी रात्री बाराच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक्स्प्रेस वेवर दोन संशयित कंटेनर ताब्यात घेतले होते. त्या कंटेनरमध्ये जनावरांचे मांस होते. दोन्ही कंटेनरमधील मांसाचे नमुने हे तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते त्यांचा अहवाल शनिवारी उशिरा प्राप्त झाला असून, त्या कंटेनरमध्ये असलेले मांस हे गोमांस असल्याचे स्पष्ट झाल्याने शनिवारी रात्री उशिरा लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कंटेनरमध्ये मिळून तब्बल 57 हजार किलो मांस आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे गोमांस विक्रीसाठी नेले जात होते.

Novel NIBR Ads

लोणावळा ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कंटेनर (एमएच 46 बीएम 9180) व कंटेनर (एमएच 46 सीयू 9966) हे व त्यांचे चालक नदीम कलीम अहमद (राहणार न्हावाशेवा, नवी मुंबई) व नसीर मोहंमद अहमद (राहणार न्हावाशेवा, नवी मुंबई) यांना ताब्यात घेतले आहे.

  • मे. एशियन फूड्स मीन अँग्रो (न्यू भोईबुडा, सिकंदराबाद हैदराबाद) या कंपनीमधून हे दोन्ही एअर कंडिशनर कंटेनर मांस भरून (न्हावाशेवा, पोर्ट मुंबई) येथे ट्रान्स्पोर्ट करण्यासाठी निघाले होते. पुणे येथील एका गोरक्षकाने याबाबतची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलिस व लोणावळा शहर ग्रामीण भागामधील गोरक्षक व विविध संघटनांचे कार्यकर्ते यांनी सदरचे कंटेनर पकडले होते.

सुरुवातीला या मासांबाबत कागदपत्रे दाखवत ते गोमांस नसून म्हशीचे मांस असल्याचे सांगण्यात आले होते. तशा प्रकारची कागदपत्रे देखील दाखवली गेली. मात्र, गोरक्षक संघटनांनी सदरची कागदपत्रे संशयास्पद असून, कंटेनरमधील मांसाची तपासणी झाल्याशिवाय सदरचे कंटेनर पुढे सोडण्यात येऊ नये, अशी मागणी लावून धरली व लोणावळा ग्रामीण पोलिसांनीदेखील सदरच्या मासाचे सॅम्पल घेत ते तपासणीसाठी पाठवले.

  • तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. तोपर्यंत कंटेनर ताब्यात ठेवण्याची आश्वासन त्यांनी दिले होते. 29 मार्च रोजी याबाबत तपासणी अहवाल लोणावळा ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाला असून, कंटेनरमध्ये असलेले मांस हे गोवंशीय मांस असल्याने निष्पन्न झाले असल्याचे लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले.

मे. एशियन फूड्स मीन अँग्रो (न्यू भोईबुडा, सिकंदराबाद हैदराबाद) या कंपनीचे मालक मोहम्मद सादिक कुरेशी व इतर यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोहा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ हे करत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade 

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News

Next Post

मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
61 foot Bhagava Flag Inaugurated at Fort at Induri In Maval taluka

मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Quality roads should be constructed under Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana DCM Sunetra Pawar

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणार; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार रस्ते

June 13, 2026
Ashadhi Palkhi Procession 2026 Best facilities should be provided for Warkaris DCMinister Sunetra Pawar

आषाढी पालखी सोहळा २०२६ : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

June 13, 2026
Crime

माळवाडी रोडवर असणारा आरओ वॉटर फिल्टर फोडून 10 हजारांची नाणी लंपास

June 13, 2026
Theft-News

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
pune police

महत्वाची बातमी! पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ ते २६ जूनपर्यंत जमावबंदी आदेश

June 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.