Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील आठवडे बाजाराच्या दिवशी वाहतुकीत सुसूत्रतेसाठी नगर परिषद कार्यालयात महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. यामध्ये आठवडे बाजारात येणाऱ्या व्यावसायिकांच्या बसण्याच्या जागांमध्ये काही बदल करून ग्राहकांच्या वाहनांसाठी वाहनतळ निश्चित करण्याबाबत चर्चा झाली.
याबैठकीला मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, तळेगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर, वाहतूकचे पोलीस निरीक्षक विशाल गजरमल, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, पथविक्रेता समिती सदस्य उपस्थित होते.
- आठवडे बाजारातील नागरिकांसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद नथुभाऊ भेगडे शाळा प्रांगण आणि रिझर्व पार्किंग डाळ आळी येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषद मार्फत वाहतूक विभागाच्या मार्गदर्शनानुसार नो पार्किंगच्या पोस्टरची लावणी करणे. बाजाराच्या दिवशी दर रविवारी पोलीस विभाग, वाहतूक विभाग, आणि नगरपालिका अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे आठवडे बाजारातील व्यावसायिकांचे बसण्याचे सुनियोजन करण्यात येणार आहे.
अनधिकृत वाहन पार्किंग करणार्या वाहनांवर वाहतूक विभाग कडून कारवाई करण्यात येईल आणि दंड आकारला जाईल. तसेच मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक ते शाळा चौक तसेच मारुती मंदिर चौक संभाजी नगर रस्ता मोकळा ठेवणे बाबत चर्चा झाली. सुभाष मार्केट येथे व्यवसायिकांची बसण्याची व्यवस्था करणे बाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number