Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि.11) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला होता. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- भरधाव वेगातील इनोव्हाने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात इनोव्हातील दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास द्रुतगती मार्गावर शिरगावजवळ हा अपघात झाला. सचिन महेद्र डेडीया (वय 46) आणि परमेश्वर शिवलिंग व्हन्ड्राव (वय 57, रा. सराटी, केशेगाव, उस्मानाबाद) असे अपघातातील मृतांची नावे आहेत.
रितेश लक्ष्मीचंद मामनीया (वय 41, रा. बोरविली, मुंबई) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रविणकुमार देवराम पंड्या (वय 39, रा. देवराम, बाडीगामा, बांसवाडा, राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास द्रुतगती मार्गावर वाहने थांबविण्यास प्रतिबंध असतानाही चालकाने रस्त्याच्याकडेला कंटनेर उभा केला. तसेच कोणताही सिग्नल लावला नाही. त्यामुळे भरधाव वेगात आलेली इनोव्हा कारने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली.
सदर अपघातात फिर्यादी यांचा मामे भाऊ व इनोव्हा चालक यांचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. ( Two killed in horrific accident on Mumbai-Pune Expressway near Shirgaon Maval )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार
– राज ठाकरेंनी भाकरी फिरवली ; मावळ तालुका मनसेत मोठे फेरबदल, तालुकाध्यक्षपदी अशोक कुटे यांची निवड । Maval News
– स्वबळावर लढण्याची तयारी हवी ; कामशेत येथील मेळाव्यात रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । Kamshet News
– वन्यजीव रक्षकांच्या प्रयत्नांना यश, कासवांच्या पिल्लांनी पाहिले जग । Maval News