व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘गौरव महाराष्ट्र’ रथयात्रेचे मावळ तालुक्यात जल्लोषात स्वागत । Maval News

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सुकाणू समिती, तालुका व शहर कार्यकारणी, युवक, युवती, महिला आघाड्यांचे पदाधिकारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 1, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Nationalist Congress Party's Gaurav Maharashtra Rath Yatra welcomed with jubilation in Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गौरव महाराष्ट्र मंगल कलश रथयात्रे’चे मावळ तालुक्यात भव्य आणि जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात राष्ट्राभिमान, सांस्कृतिक गौरव आणि ऐतिहासिक जाणीवेचा संगम पहायला मिळाला.

वडगाव मावळ येथे बुधवारी (दि. 30) दुपारी चार वाजता आणि त्यानंतर लोणावळा शहरात संध्याकाळी पाच वाजता रथयात्रेचे औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी “तोच उत्साह, तोच जयघोष, आणि आपल्या मातृभूमीच्या गौरवासाठी तोच अभिमान!” अशी भावना प्रत्येकाच्या मनात दिसून आली.

  • या यात्रेचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला ६५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून, एक मे ते चार मेदरम्यान विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.

गौरव रथयात्रेचा उद्देश तरुण पिढीला महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या व्यक्ती, स्थळे, घटना यांची ओळख करून देण्याचा आहे. या रथात महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचे जल, धार्मिक स्थळांची माती, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांची माती एकत्रित करून त्याचे पूजन करण्यात आले आहे. ही यात्रा मुंबईच्या दिशेने प्रस्थान करणार असून, लोकनेते यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणीही पक्षाच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

  • यात्रे समवेत लतिफ तांबोळी, सुरेश अण्णा घुले, राजाभाऊ कोरेकर आदी नेते होते. मावळ तालुक्यातील या भव्य स्वागत सोहळ्यात आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे तसेच गणेश आप्पा ढोरे, विठ्ठलराव शिंदे, साहेबराव कारके, दीपक हुलावळे, संदीप आंद्रे, किशोर सातकर, दीपाली गराडे, पायल देवकर, पंढरीनाथ ढोरे, मयूर ढोरे, प्रवीण ढोरे, संध्या थोरात, नारायण ठाकर, काळुराम मालपोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सुकाणू समिती, तालुका व शहर कार्यकारणी, युवक, युवती, महिला आघाड्यांचे पदाधिकारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.

अधिक वाचा –
– लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
– मोठा निर्णय : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात आता ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ उभारणार ; 18 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
– ‘पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा’ ; लोणावळा भेटीत रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य । Ramdas Athawale
– पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी आणखीन जमिनीची आवश्यकता, अतिरिक्त जमिनीसाठी ‘या’ 32 गावांमध्ये होणार भूसंपादन । Pune Ring Road


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव मावळ तहसीलदार कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा ; आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Complete road works in Talegaon city by May 30 MLA Sunil Shelke suggestion in review meeting

30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 5, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.