व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणूक 2022 : मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या 83 जागांसाठी 225 उमेदवारी अर्ज, सरपंच पदासाठी 51 अर्ज

राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण 7751 ग्रामपंचायतींकरिता निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 3, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Gram-Panchayat-Election

File Photo : Gram Panchayat Election 2022


राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण 7751 ग्रामपंचायतींकरिता निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. यात मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या 83 जागांसाठी 219 उमेदवारांचे एकूण 225 अर्ज आले. तर, सरपंच पदासाठी 51 उमेदवारी अर्ज दाखल झाले, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. ( Gram Panchayat Election 2022 225 Nominations For 9 GramPanchayat In Maval Taluka 51 Applications For Sarpanch Post )

मावळ तालुक्यातील सध्या होत असलेल्या नऊ ग्रामपंचायतींमध्ये इंदोरी, सावळा, देवले, भोयरे, शिरगाव, वरसोली, कुणे नामा, निगडे आणि गोडुंब्रे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार दिनांक 18 डिसेंबर रोजी होणार आहे. शुक्रवारपर्यंत भरलेल्या उमेदवारी अर्जांची सोमवार 5 डिसेंबर रोजी छाननी होणार आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

1. इंदोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 5 तर 6 प्रभागातील 17 जागांसाठी 38 अर्ज आले आहेत.
2. निगडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 5 तर 3 प्रभागातील 9 जागांसाठी 37 अर्ज आले आहेत.
3. भोयरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 4 तर 3 प्रभागातील 7 जागांसाठी 17 अर्ज आले आहेत.
4. सावळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 5 तर 3 प्रभागातील 7 जागांसाठी 11 अर्ज आले आहेत.
5. शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 11 तर 3 प्रभागातील 9 जागांसाठी 42 अर्ज आले आहेत.
6. गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 5 तर 3 प्रभागातील 9 जागांसाठी 14 अर्ज आले आहेत.
7. वरसोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 3 तर 3 प्रभागातील 9 जागांसाठी 21 अर्ज आले आहेत.
8. देवले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 6 तर 3 प्रभागातील 7 जागांसाठी 18 अर्ज आले आहेत.
9. कुणे नामा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 7 तर 3 प्रभागातील 9 जागांसाठी 27 अर्ज आले आहेत.
( Gram Panchayat Election 2022 225 Nominations For 9 GramPanchayat In Maval Taluka 51 Applications For Sarpanch Post )

अधिक वाचा –

– ग्रामपंचायत निवडणूक : 23 डिसेंबरपर्यंत जवळ शस्त्र बाळगण्यास मनाई, कलम 144 लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, वाचा
– पंधरावा वित्त आयोग : ग्रामपंचायती होणार मालामाल, पाहा पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्याला किती निधी मिळणार?
– गाव तसं चांगलंच..! सरपंच पदाच्या निवडणूकीत 1 मताने हरला उमेदवार; गावाने 11 लाख, 1 कार आणि जमीन देऊन केला सत्कार


dainik maval jahirat

Previous Post

खुशखबर! पर्यटन विभागाकडून 3 दिवस मोफत सहल; आगाखान पॅलेस ते तळेगावमधील बाबासाहेबांचे निवासस्थान आदींचा समावेश

Next Post

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना 140 संगणक संच भेट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Computer-Gift-ToZilla-Parishad-Primary-Schools

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना 140 संगणक संच भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.