व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आंबी येथे लवकरच सुरु होणार भव्य रुग्णालय ; मावळवासीयांसाठी आरोग्यसेवेचा नवा अध्याय – आमदार सुनील शेळके

मावळवासीयांच्या आरोग्यसेवेला अधिक सक्षम करण्यासाठी आंबी येथे उभारण्यात आलेले 'पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटल' लवकरच सुरु होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 12, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Pushpalata DY Patil Hospital to be opened soon at Ambi Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळवासीयांच्या आरोग्यसेवेला अधिक सक्षम करण्यासाठी आंबी येथे उभारण्यात आलेले ‘पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटल’ लवकरच सुरु होणार आहे. या हॉस्पिटलला आमदार सुनील शेळके यांनी नुकतीच भेट दिली आणि विश्वास व्यक्त केला की, हा प्रकल्प मावळवासीयांच्या आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांप्रमाणेच, हे नवीन आणि सुसज्ज हॉस्पिटल मावळमधील नागरिकांच्या सेवेसाठी लवकरच खुले होणार आहे, ही आनंदाची बाब आहे, असे आमदार शेळके यांनी भेटी दरम्यान सांगितले.

या अत्याधुनिक रुग्णालयात रुग्णांसाठी तब्बल ६५० बेड्सची सोय असणार आहे. यासोबतच, येथे ९ सुपर स्पेशालिटी ऑपरेशन थिएटर्स, ६४ अत्याधुनिक आयसीयू बेड्स आणि नवजात शिशूंसाठी १० एनआयसीयू बेड्स उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त, रुग्णांना डायलिसिस सेंटर, सिटी स्कॅन आणि एम.आर.आय. सारख्या महत्त्वाच्या सुविधाही येथे मिळणार आहेत.

या हॉस्पिटलचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना आणि इतर शासकीय आरोग्य योजना लागू असणार आहेत. त्यामुळे मावळ भागातील गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत तसेच सुलभ उपचार घेणे शक्य होणार आहे.

डॉ. विजय पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे हॉस्पिटल आरोग्यसेवेच्या क्षेत्रात एक नवीन मापदंड स्थापित करेल, असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला. त्यांनी डॉ. पाटील यांच्या समाजसेवेतील तळमळीची प्रशंसा केली आणि त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. या महत्त्वपूर्ण हॉस्पिटलचे लोकार्पण लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडणार आहे.

अधिक वाचा –
– मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News
– मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News
– लोणावळ्यात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ! अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश
– मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link


Previous Post

इंदुरी ते सांगुर्डी मुख्य रस्त्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन ; ‘पीएमआरडीए’कडून 7.64 कोटी निधी उपलब्ध । Maval News

Next Post

वराळे येथे झालेल्या केटरिंग कामगाराच्या हत्येप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

वराळे येथे झालेल्या केटरिंग कामगाराच्या हत्येप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Second-Registrar-Office-Vadgaon-Maval

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

March 21, 2026
Provide funds to solve problems in Dehu Road Cantonment Board MP Shrirang Barne demand to Defense Department

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील समस्या सोडवण्यासाठी निधी द्या ; खासदार श्रीरंग बारणे यांची संरक्षण विभागाकडे मागणी

March 21, 2026
Maval MLA Sunil Shelke met new Commissioner of PMRDA Abhijeet Chaudhary

लोणावळ्यातील प्रमुख रस्ते, नदी सुधार प्रकल्प, गडकिल्ल्यांचा विकास आदी प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळकेंनी घेतली PMRDA च्या नवीन आयुक्तांची भेट

March 21, 2026
Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.