व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूत गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न ; पोलीस आणि चोरट्यांत सीनेस्टाईल फायटींग, दोन आरोपी ताब्यात, तीन फरार

देहू येथे गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना देहूरोड पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 28, 2025
in लोकल, शहर
thieves trying to break open an atm using gas cutter in dehu caught red handed dehuroad police

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहू येथे गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना देहूरोड पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलीस आणि चोरट्यांमध्ये फिल्मी स्टाईल धरपकड देखील झाली. मुस्तफा मोबिन खान आणि मुस्तकीन मोबिन खान (दोघेही रा. हरियाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

देहूगाव येथील इंडसइंड बँकेच्या एटीएममध्ये गॅस कटरच्या सहाय्याने दरोडा टाकणाऱ्या हरियाणातील टोळीतील दोघांना देहूरोड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. मोटारीतून पळून गेलेल्या तीन साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री दोनच्या सुमारास घडली.

सीमा युसूफ खान (४०), वारीस खान (२०), आझाद खान (४५, सर्व रा. हरियाणा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १.५० च्या दरम्यान देहू-आळंदी रोडवरील इंडसइंड बँकेच्या एटीएमजवळ थांबलेली पांढऱ्या रंगाची मोटार बीट मार्शल समाधान पटावकर व किरण पाटील यांना दिसली.

पोलीस आल्याचे पाहताच मोटार भरधाव वेगाने गेली. पोलीस एटीएमकडे धावले असता, एटीएमचे शटर उचकटलेले दिसले व आतून उजेड आणि आवाज येत असल्याने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक जोएब शेख यांना तातडीने माहिती दिली. पोलिसांनी शटर उघडून आत प्रवेश केला असता, दोन संशयित गॅस कटरने एटीएम तोडण्याचा प्रयत्न करत होते.

पोलिसांना पाहून संशयितांनी शिवीगाळ, दगडफेक केली. आरडाओरडा येकून नागरिक घराबाहेर आले. नागरिकांनी ही पोलिसांना मदत केली, आणि आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव मावळ येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम त्वरित सुरू करावे; लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची मागणी

Next Post

मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Big news Agricultural assistants strike ends government accepts most of their demands

मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.