व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 31, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे : वृद्ध सासूचा खून करणाऱ्या सुनेला जन्मठेप, वडगाव कोर्टाचा निकाल । Maval Crime

पूजा मिलिंद शिंदे असे जन्मठेप शिक्षा झालेल्या सुनेचे नाव आहे. पूजा हिने वादाचा राग मनात धरून सासूचा गळा आवळून खून केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 29, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Jail-And-Court

File Image


Dainik Maval News : कौटुंबिक वादातून सासूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात टाकून टेरेसवर ठेवला. सडलेला मृतदेह पतीच्या मदतीने नाल्यात फेकून दिला. ही घटना तळेगाव दाभाडे येथे २०२१ मध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी सून आणि मुलाला अटक केली होती. यातील आरोपी सुनेला जन्मठेप, तर मृत महिलेच्या मुलाला १८ महिने कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

nakshtra ads may 2025

वडगाव मावळ सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी हे आदेश दिले. पूजा मिलिंद शिंदे असे जन्मठेप शिक्षा झालेल्या सुनेचे नाव आहे. पूजा हिने वादाचा राग मनात धरून सासूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह दोन दिवस टेरेसवर पोत्यामध्ये बांधून ठेवला.

tata tiago ads may 2025

दिराने, “आई कुठे आहे” असे विचारले असता, “ती माझ्यासोबत वाद करून घरातून निघून गेली,” असे पूजाने सांगितले. दरम्यान, शेजान्यांनी “तुमच्या टेरेसवरील पोत्यातून घाण वास येत असून ते फेकून द्या,” असे सांगितले. पूजा हिने ते पोते नाल्यामध्ये नेऊन टाकले. यासाठी तिचा पती मिलिंद याच्याकडून तिला मदत झाली.

सरकारतर्फे खटल्यामध्ये विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकुंद चौगुले यांची नियुक्ती होती. चौगुले यांनी न्यायालयात वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे याच्यासह साक्षीदार उभे करून युक्तिवाद केला. त्याकरिता त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करत बाजू मांडली.

देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार, तत्कालीन तपासी अधिकारी नारायण पाटील, कोर्ट पोलीस अंमलदार अविनाश गोरे यांनी न्यायालयात पाठपुरावा केला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर
– मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार शेळकेंचा पुढाकार ; मंत्रालयातील बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी


dainik maval ads may 2025

Previous Post

मावळ तालुक्यात पावसाचा जोर ओसरला ! नांगरट आणि पेरणीसाठी चांगल्या उन्हाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा । Maval News

Next Post

अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि परिसराचा विकास होणार ; अष्टविनायक विकास आराखड्यासाठी 148 कोटी खर्चास मान्यता

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ashtavinayak temples will be renovated Rs 148 crore approved for Ashtavinayak development plan

अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि परिसराचा विकास होणार ; अष्टविनायक विकास आराखड्यासाठी 148 कोटी खर्चास मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drunk driver runs over MPSC students in Pune twelve injured CM Fadanvis takes note

मोठी बातमी : पुण्यात मद्यपी वाहन चालकाने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना उडवले, बारा जण जखमी, मुख्यमंत्र्यांकडून दखल । Pune News

May 31, 2025
Accident

ताजे गावाजवळ भीषण अपघात ! पिकअपचे पंक्चर काढत असलेल्या दोघांना भरधाव वाहनाने चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू

May 31, 2025
MLA Sunil Shelke take review meeting at Lonavala Municipal Council Anger on officials

नागरिकांना वेळ द्या, त्यांचे प्रश्न सोडवा ; लोणावळ्यातील आढावा बैठकीत आमदार शेळके यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी । Lonavala News

May 31, 2025
Seventeen year old boy drowned in Valvan dam Lonavala

मित्रांसोबत फिरायला आलेल्या सतरा वर्षीय निलेशचा वलवण धरणात बुडून मृत्यू । Lonavala News

May 31, 2025
Former students of Pavana Vidya Mandir came together again after 27 years valuable help to school

पवना विद्या मंदिरचे माजी विद्यार्थी २७ वर्षांनी पुन्हा आले एकत्र ; शाळेला केली मोलाची मदत । Pavananagar News

May 31, 2025
Balasaheb Masurkar elected as president of Kothurne Society Pavan Maval

कोथुर्णे कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मसुरकर यांची निवड । Pavan Maval

May 31, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.