व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि परिसराचा विकास होणार ; अष्टविनायक विकास आराखड्यासाठी 148 कोटी खर्चास मान्यता

अष्टविनायक विकास आराखड्यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच परिसराचा विकास होणार असून देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना पायाभूत, नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 29, 2025
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Ashtavinayak temples will be renovated Rs 148 crore approved for Ashtavinayak development plan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने 147 कोटी 81 लाख रुपये खर्चाच्या ‘अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार व विकास आराखड्या’स सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. अष्टविनायक विकास आराखड्यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच परिसराचा विकास होणार असून देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना पायाभूत, नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. अष्टविनायक क्षेत्रांच्या विकासामुळे राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

  • अष्टविनायक मंदिरे जीर्णोद्धार व विकास आराखड्यास गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने प्रयत्नशील होते. यासंदर्भात मंत्रालयात सातत्याने संबंधीतांच्या बैठका घेऊन त्यांनी अष्टविनायक मंदिर जीर्णोद्धार आणि विकासाच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे यासंबधीच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून 6 मे 2025 रोजीच्या चौंडी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर दोन आठवड्यातंच 147 कोटी 81 लाख खर्चाचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जारी झाला. त्याबद्दल अष्टविनायक भक्तांकडून, स्थानिक नागरिकांकडून अजित पवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

वित्तमंत्री पवार यांच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेली राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाची महत्वाची स्थळे, तीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेऊन, संबंधित आराखडे नियोजन विभागामार्फत राबविण्यात येतात. स्थानिक पातळीवरील संबंधित आणि तज्ज्ञांशी चर्चा करुन चौंडी स्मृतीस्थळ जतन व विकास व त्यास लागणाऱ्या निधीचा आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार 2021-22 मध्ये 92 कोटी 19 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर 2024 मध्ये 147 कोटी 81 लाखांचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यास आज सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार, पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या श्रीमयुरेश्वर मंदिरासाठी 8 कोटी 21 लाख, थेऊरच्या श्रीचिंतामणी मंदिरासाठी 7 कोटी 21 लाख, ओझरच्या श्रीविघ्नेश्वर मंदिरासाठी 7 कोटी 84 लाख, रांजणगावच्या श्रीमहागणपती मंदिरासाठी 12 कोटी 14 लाख रुपयांच्या खर्चास सुधारीत मान्यता देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील महडच्या श्रीवरदविनायक मंदिरासाठी 28 कोटी 24 लाख, पालीच्या श्रीबल्लाळेश्वर मंदिरासाठी 26 कोटी 90 लाख रुपये खर्चास सुधारित मान्यता मिळाली आहे.

अहिल्यानगरच्या श्रीसिद्धटेक मंदिरासाठी 9 कोटी 97 लाख रुपयांच्या खर्चास सुधारित मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण शंभर कोटी 53 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून विद्युतीकरण, रोषणाई, वास्तूविशारद, जीएसटी आदी खर्चासाठी 47 कोटी 39 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने 147 कोटी 81 लाख खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे अष्टविनायक क्षेत्राच्या विकासाला गती मिळणार असून त्याबद्दल भाविकांकडून, नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर
– मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार शेळकेंचा पुढाकार ; मंत्रालयातील बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी


Previous Post

तळेगाव दाभाडे : वृद्ध सासूचा खून करणाऱ्या सुनेला जन्मठेप, वडगाव कोर्टाचा निकाल । Maval Crime

Next Post

वडगाव साहित्य, कला व संस्कृती मंडळाकडून पुस्तक अभिवाचनातून डॉ. जयंत नारळीकर यांना अभिवादन । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Literature Art and Culture Board greets Dr Jayant Narlikar through a book reading

वडगाव साहित्य, कला व संस्कृती मंडळाकडून पुस्तक अभिवाचनातून डॉ. जयंत नारळीकर यांना अभिवादन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट ; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

February 16, 2026
Lakhs of rupees were extorted from candidates in name of EVM machine hacking MLA Sunil Shelke serious allegations

ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांवर गंभीर आरोप

February 16, 2026
Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.