व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव साहित्य, कला व संस्कृती मंडळाकडून पुस्तक अभिवाचनातून डॉ. जयंत नारळीकर यांना अभिवादन । Vadgaon Maval

वडगाव साहित्य, कला व संस्कृती मंडळाच्या वतीने आयोजित ‘पुस्तक अभिवाचन कार्यशाळा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 29, 2025
in शहर, मावळकट्टा, लोकल
Vadgaon Literature Art and Culture Board greets Dr Jayant Narlikar through a book reading

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव साहित्य, कला व संस्कृती मंडळाच्या वतीने आयोजित ‘पुस्तक अभिवाचन कार्यशाळा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. या कार्यशाळेद्वारे ज्येष्ठ वैज्ञानिक व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या सुप्रसिद्ध ‘अंतराळातील भस्मासुर’ या विज्ञानकथासंग्रहातील दहा प्रकरणांचे अभिवाचन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व लोणकर गुरुजी यांच्या गणेशस्तवनाने झाली. संस्थेचे अजित देशपांडे यांनी प्रास्ताविक करत अभिवाचनाची संकल्पना, त्याचे महत्त्व व नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यामागील प्रेरणा सांगितली. संभाजी मोरे यांनी डॉ. नारळीकर यांचे जीवनकार्य आणि विज्ञानवादी दृष्टिकोन यावर भाष्य केले. जेष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी मंडळाच्या भावी योजनांची माहिती दिली. संस्था भविष्यात अश्या अनेक कार्यशाळांचे आयोजीत करणार असून त्यातुन नव्या पिढींला साहित्य, कलेविषयी आवड निर्माण होणार आहे, असे प्रतिदान केले.

दुसऱ्या सत्रात अभिवाचन सादरीकरण झाले. दहा अभिवाचक सदस्यांनी सादर केलेली प्रकरणे;
1. माधवी बाळासाहेब बोरावके – अंतराळातील भस्मासुर
2. अनुजा गोगटे – हिमप्रलय
3. ॲड. स्वाती वाळुंजकर – आकाशतले डोळे
4. रोहिणी भोर – स्फोट
5. शेखर पोफळे – अहंकार
6. साक्षी जोगळेकर – खरा वैज्ञानिक कोण?
7. प्रतिक्षा पाटील – विज्ञान युगात नारद
8. निलीमा भालेराव – लपलेला तारा
9. दीपक भालेराव – पेरूवाडीतील पुष्पक प्रकरण
10. पुष्कराज लोणकर – विज्ञानयुग व विज्ञानसाहित्य

कार्यशाळा संवादात्मक स्वरूपात राबविण्यात आली. उपस्थितांनी मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे व शंकासमाधान करण्यात आले. मोहिनी गवस यांनी मनोगत व्यक्त करत मंडळाच्या स्थापनेचे स्वागत केले आणि भविष्यात असे उपक्रम सातत्याने व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमात महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी होती. वडगावमधील साहित्य चळवळीला नवा आयाम देणारा हा उपक्रम यशस्वी ठरला असून मंडळाच्या पुढील उपक्रमांची उत्सुकता आता अधिक वाढली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर
– मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार शेळकेंचा पुढाकार ; मंत्रालयातील बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी


Previous Post

अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि परिसराचा विकास होणार ; अष्टविनायक विकास आराखड्यासाठी 148 कोटी खर्चास मान्यता

Next Post

आषाढी वारी आढावा बैठक : प्रत्येक दिंडीसोबत पोलीस, वॉटरप्रुफ मंडप, वाखरी येथे मॉडेल वारकरी तळ, वारकऱ्यांसाठी समूह विमा कवच

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Make Ashadhi Wari success through coordination of all departments instructions from CM Devendra Fadnavis

आषाढी वारी आढावा बैठक : प्रत्येक दिंडीसोबत पोलीस, वॉटरप्रुफ मंडप, वाखरी येथे मॉडेल वारकरी तळ, वारकऱ्यांसाठी समूह विमा कवच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट ; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

February 16, 2026
Lakhs of rupees were extorted from candidates in name of EVM machine hacking MLA Sunil Shelke serious allegations

ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांवर गंभीर आरोप

February 16, 2026
Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.