Dainik Maval News : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावरील देहूरोड कँन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील संविधान चौकाजवळील पाच उपहारगृहे बुधवारी सकाळीच जमीनदोस्त करण्यात आली. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अतिक्रमण पथक, लष्करी बंदोबस्त आणि चार जेसीबीच्या साहाय्याने ही धडक कारवाई करण्यात आली.
लष्करी जागेवरील देहूरोड सेंट्रल चौकातील ही पाचही उपहार गृहे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या धडक कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे एरवी गजबजलेला दिसणारा आणि अरुंद वाटणारा हा चौक आता चांगलाच विस्तीर्ण व मोकळा दिसू लागला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून संविधान चौकात ही उपहारगृहे होती. खवय्यांच्या वाढत्या संख्येमुळे चौकात अलीकडे गर्दी वाढली होती. त्यामुळे चौकात अन्य छोट्या व्यावसायिकांची चहाची वगैरे दुकाने चालू होती, काही गॅरेज पण होती. दरम्यान या कारवाईमुळे आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक पर्यावरण दिन । राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश
– महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय!