Dainik Maval News : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
सदर बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, कार्यपद्धतीतील सुसूत्रता आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासह नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
सदर बैठकीस विश्वजीत बारणे, शरद हुलावळे, राजेश खांडभोर, विशाल हुलावळे, राजेश वाघोले, राम सावंत, सुनिल हगवणे, संजय भोईर, देवा खटरमल, दिपक चौगुले, दत्ता केदारी, चंद्रकांत भोते, नवनाथ हरपुडे तसेच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. खासदार बारणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश