व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील उर्से गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन । Maval News

जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी विशेष लक्ष - राहुल घाडगे यांचे मार्गदर्शन

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 8, 2025
in लोकल, ग्रामीण
Developed Agricultural Resolution Mission Farmers meeting organized in Urse village Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या संकल्पनेतून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात दिनांक २९ मे ते १२ जुन २०२५ दरम्यान होणाऱ्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ सुरू आहे. यानिमित्ताने मावळ तालुक्यातील उर्से गावामध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.

यावेळी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ राहुल घाडगे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. घाडगे म्हणाले की, आपल्या शेतजमिनीची सुपिकता दिवसेंदिवस घटत आहे. परिणामी उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून उत्पादन घटत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सेंद्रीय खतांचा होत असलेला कमी वापर. त्यामुळे जमिनीचा सैंद्रीय कर्ब कमी होत आहे आणि घटत चाललेला सेंद्रीय कर्ब यामुळे शेती तोट्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून एकात्मिक खत व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

  • याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी मारुती साळी, भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ तुकाराम भोर, शास्त्रज्ञ डॉ प्रांजली गेडाम, डॉ स्वाती साहा, उपकृषी अधिकारी विकास गोसावी, सहाय्यक कृषी अधिकारी अश्विनी खंडागळे, सरपंच भारती गावडे, प्रगतशील शेतकरी सुभाष धामणकर व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भात संशोधन केंद्र वडगाव मावळ शास्त्रज्ञ तुकाराम भोर यांनी भाताच्या विविध जाती, भाताची नर्सरी तयार करण्याची पद्धत, चार सुत्री लागवड पद्धती याविषयी सखोल मार्गदर्शन केले. मावळ तालुका कृषी अधिकारी मारुती साळी यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विकास गोसावी यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजन अश्विनी खंडागळे यांनी केले. आभार शेतकरी भारत ठाकूर यांनी व्यक्त केले.

‘संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या महत्वाकांक्षी अभियानात कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञानी खरीप हंगामातील नियोजन, पिकांचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, सोयाबीन बीज प्रक्रिया, ड्रोन प्रात्यक्षिक, कृषी विभागाच्या विविध योजना आदींबाबत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रमाचे आयोजन केला होता. – राहुल घाडगे, विषयतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र-नारायणगाव

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश


dainik maval jahirat

Previous Post

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या बारा जणांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल । Dehu Road Crime

Next Post

Bhushi Dam : लोणावळ्यातील भूशी डॅममध्ये दोन पर्यटक बुडाले, शोध सुरू । Lonavala New

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bhushi-Dam

Bhushi Dam : लोणावळ्यातील भूशी डॅममध्ये दोन पर्यटक बुडाले, शोध सुरू । Lonavala New

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.