Dainik Maval News : लोणावळा शहरातील प्रसिद्ध भुशी डॅम (Bhushi Dam) धरणात दोन पर्यटक बुडाल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही पर्यटक उत्तर प्रदेश येथील असल्याचे समजते. भुशी डॅमच्या पाठीमागील बाजूस असलेल्या धबधब्याजवळ हे पर्यटक गेले होते. रविवारी (दि. ८ जून) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, जमाल आणि साहील (दोघेही रा. उत्तर प्रदेश, पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी बुडालेल्या पर्यटकांची नावे आहेत. भुशी धरण्याच्या बॅकवॉटर परिसरात ते गेले होते व तिथे ते बुडाले अशी माहिती मिळत असून याबाबत शिवदुर्ग रेस्कू पथकाला कळविण्यात आले आहे. शिवदुर्गची टीम शोध व बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे.
तसेच, घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह लोणावळा शहर पोलीस कर्मचारी हेही घटनास्थळी दाखल झाले असून धरणात बुडालेल्या दोन्ही युवकांचा शोध सुरू आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश