व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘जलजीवन मिशन’ची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका आणि त्यांच्याकडूनच पैसे वसूल करा – खासदार बारणे

वडगावमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 13, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Review meeting of Maval Assembly Constituency concluded in presence of MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पावसाळ्यात लोणावळा, कार्ला, आंदर, पवन, नाणे मावळात मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येतात. पर्यटकांना सुविधा द्याव्यात. त्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पार्किगच्या जागेत पाणी साचते, तिथे मुरुम टाकून दुरुस्ती करुन घ्यावी. पोलिसांनी पर्यटकांना केवळ धाक दाखवू नये, पर्यटकांना सुविधा द्यावी. चुकीचे कृत्य करणाऱ्या पर्यटकावर कारवाई करावी. अतिउत्साही पर्यटक धबधब्याखाली पाण्यात उतरतात, त्यासाठी कर्मचारी वाढवावेत. वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

  • खासदार श्रीरंग बारणे हे विधानसभानिहाय बैठक घेत आहेत. त्यानुसार मावळ विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक गुरुवारी वडगाव येथील पंचायत समिती कार्यालयात पार पडली. या बैठकीला प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, मावळ तहसीलदार विक्रम देशमुख, गट विकास अधिकारी कुलदीप प्रधान, वडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रवीण निकम, तळेगावचे मुख्याधिकारी विजय सरनाईक, लोणावळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी अशोक साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय पाटील, क्षीरसागर उप, धनराज दराडे, कविता पाटील, पोलीस निरीक्षक प्रभापती पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजया म्हेत्रे, कृषी अधिकारी मारुती साळे, माजी सभापती गुलाब म्हाळस्कर, विविध पक्षाचे प्रतिनिधी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, महसूल, कृषी, पाणीपुरवठा सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने चालू असलेल्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत. रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. आई एकिवरा देवीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. कामाच्या दर्जा राखावा, कामाला गती देऊन पूर्णत्वाकडे न्यावे. कार्ला ते मळवली दरम्यानचा रस्ता अर्धवट आहे. तो पूर्ण करावा. भाजे लेणीपासून लोहगड, विसापूर किल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे कामही अर्धवट आहे. ते पूर्ण करावे. जिल्हा परिषदे अंतर्गत सुरु असलेले रस्त्यांची कामेही तातडीने पूर्ण करावीत.

जलजीवन मिशनअंतर्गत मावळ मतदारसंघात सुरु असलेल्या कामांमध्ये अनेक त्रुटी आहेत. याबाबत काही ग्रामपंचातीच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे कामास सुधारणा करावी. दर्जेदार काम करावे. ठेकेदारांनी काम वेळेत पूर्ण केले नाही. अशा ठेकेदारांवर कारवाई करावी. त्यांना काळ्या यादीत टाकावे. त्यांच्याकडून पैशांची वसुली करावी, असेही बारणे म्हणाले.

मावळातील अवैध धंदे बंद झाले पाहिजेत. धाब्यावर अवैधपणे मद्य विक्री केली जाते. मावळात एमडी ड्रग मोठ्या प्रमाणात विकले जाते. शाळांजवळ गुटखा विक्री केली जाते. त्यावर कारवाई करावी. साथीचे आजार वाढू नयेत यासाठी औषध फवारणी करावी. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी काही काळजी घ्यावी याबाबत आरोग्य विभागाने जनजागृती करावी.

हावितरणने पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी करुन घ्यावी. ज्या ठिकाणी डीपीची मागणी आहे, तेथे डीपी बसवावेत. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घ्यावी. जनजागृती करुन सुर्यघर आणि कुसूम योजना लोकांपर्यंत पोहचवावी. बियाणे, खतांची विक्री चढ्या दराने होणार नाही, याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश । ahmedabad plane crash
– एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News


dainik maval jahirat

Previous Post

अहमदाबाद विमान दुर्घटनेत प्रवाशांसह २६५ जणांचा मृत्यू ; पंतप्रधान मोदींकडून घटनास्थळाची पाहणी, जखमींची विचारपूस । Air India plane crash

Next Post

प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियान : पुणे जिल्ह्यातून ९९ गावांची निवड, मावळ तालुक्यातील आठ गावांचा समावेश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Prime Minister Dharti Aba Tribal Village Utkarsh Abhiyan

प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियान : पुणे जिल्ह्यातून ९९ गावांची निवड, मावळ तालुक्यातील आठ गावांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.