Dainik Maval News : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदोरी) येथील इंद्रायणी नदी वरील लोखंडी पूल कोसळल्याची दुर्घटना रविवारी, दिनांक 15 जून 2025 रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास घडली आहे. सदर लोखंडी पूल हा आजुबाजूच्या दोन गावांना जोडणारा लोखंडी पूल असून हा लोखंडी पूल सुमारे 30 वर्ष जुना आहे.
- रविवारी कुंडमळा या ठिकाणी अंदाजे 100 ते 125 पर्यटक वर्षाविहारासाठी आले असता लोखंडी पुल कोसळून त्या खाली काही पर्यटक अडकले असल्याचे समजताच सदर ठिकाणी बचावकार्यासाठी स्थानिक प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे 2 पथक, पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस यंत्रणा, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), आपदा मित्र, पुणे / पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) चे अग्निशमन दल, शिवदुर्ग संघटना, वन्यजीव संघटना यांचे मार्फत शोधकार्य सुरु केले होते.
रात्री उशीरापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेमध्ये एकूण 51 व्यक्ती जखमी झाले असून जखमी व्यक्तींना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील 1) पवना रुग्णालय, 2) मायमर हॉस्पिटल, 3) अथर्व हॉस्पिटल आणि 4 ) युनिक हॉस्पिटल मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. सदर घटनेत एकूण 04 व्यक्तींचा मृत्यू झाला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
- इंद्रायणी नदीपात्रात कोसळलेला लोखंडी पूल क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. तसेच सदर घटनास्थळी मंत्री आपत्ती व्यवस्थापन, मंत्री- मदत व पुनर्वसन, विभागीय आयुक्त-पुणे विभाग, खासदार बारामती लोकसभा, आमदार मावळ विधानसभा, जिल्हाधिकारी पुणे उपविभागीय अधिकारी- मावळ, तहसिलदार मावळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तळेगाव दाभाडे हे उपस्थित होते.
ह्या घटनेच्या अनुषंगाने अधिक माहिती आवश्यक असल्यास नियंत्रण कक्षाच्या खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे…
टोल फ्री 1077
नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र.: 020-26123371, 26133522, 26133523
विठ्ठल बनोटे (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी) 8975232955
राहुल पोखरकर ( आपत्ती व्यवस्थापन कक्ष सहाय्यक) : 8888565317
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ ; मावळ तालुक्यातील 24 शाळांचा समावेश
– केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी बनविलेली नियमावली महाराष्ट्रात तातडीने लागू करा ; मावळ पोल्ट्री संघटनेचे निवेदन
– देहूरोड खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक ; पोलिसांनी गुजरातच्या वडोदरातून घेतले ताब्यात । Maval Crime
– विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन । Maval News