व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मावळमधील कुंडमळा दुर्घटनेची दखल; पंतप्रधान मोदी म्हणाले… । Kundmala Indrayani River Bridge Accident

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची राज्यासह केंद्र सरकारनेही तातडीने दखल घेतली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 16, 2025
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मावळमधील कुंडमळा दुर्घटनेची दखल; पंतप्रधान मोदी म्हणाले… । Kundmala Indrayani River Bridge Accident

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची राज्यासह केंद्र सरकारनेही तातडीने दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. तसेच घटनास्थळी मदतकार्याच्या सूचना दिल्या. राज्य सरकारनेही तातडीने मदतकार्य सुरू केले, यामुळे होणारी हानी कमी झाली. ( Kundmala Indrayani River Bridge Accident )

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुःख व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. तसेच आवश्यक ती मदत केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यासह दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सायप्रस येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून पुणे जिल्ह्यातील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची माहिती घेतली आणि या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या मदतकार्यात राज्य सरकारला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

अमित शाह यांच्याकडून मदतकार्याबद्दल सूचना
गृहमंत्री अमित शाह यांनी देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कुंडमळा दुर्घटनेची माहिती घेतली. तसेच बचावकार्यासाठी सर्व यंत्रणांना सहभागी होण्याच्या सूचना दिल्या. यासह दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Photo Courtesy : Team Dainik Maval

काय म्हणाले अमित शाह –
अमित शाह यांनी एक्सवर (जुने ट्विटर) पोस्ट केली आहे. “पुण्यातील तळेगाव येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेने खूप दुःख झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आणि सध्याच्या परिस्थितीची विचारपूस केली. जवळच तैनात असलेल्या एनडीआरएफ पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, बचाव कार्यात सहभागी झाले आणि उल्लेखनीय तत्परतेने अनेकांचे जीव वाचवले. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना.”

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– BREAKING : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती
– कुंडमळा पूल दुर्घटना : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 51 जखमी, अजुनही शोधकार्य सुरू
– कुंडमळा येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, दोषींवर कठोर कारवाई होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार । Kundmala Indrayani River Bridge Accident


dainik maval jahirat

Previous Post

कुंडमळा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची आर्थिक मदत; जखमींचा उपचार खर्चही सरकार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

कुंडमळा दुर्घटनेवर राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया ; पूल धोकादायक होता मग पूर्ण प्रवेशबंदी का नाही? सरकार निष्काळजीपणा दाखवणार असेल तर…

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MNS President Raj Thackeray detailed reaction on the Kundmala bridge tragedy Maval

कुंडमळा दुर्घटनेवर राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया ; पूल धोकादायक होता मग पूर्ण प्रवेशबंदी का नाही? सरकार निष्काळजीपणा दाखवणार असेल तर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.