व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पीएमआरडीए’कडून नियमबाह्यपणे पूर्णत्वाचे दाखले…आमदार शेळकेंच्या तक्रारीनंतर विधानसभा उपाध्यक्षांकडून आढावा बैठक

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून बांधकाम विकासकांना नियमबाह्यरित्या पूर्णत्वाचे दाखले दिले जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 21, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
MLA Sunil Shelke complaint regarding PMRDA irregularities Review meeting held by Anna Bansode

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून बांधकाम विकासकांना नियमबाह्यरित्या पूर्णत्वाचे दाखले दिले जात असल्याचा गंभीर आरोप होत असून याबाबत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील आवाज उठविला आहे. याअनुषंगाने विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे गुरुवारी (दि. १९) आढावा बैठक पार पडली.

नियमानुसार प्रकल्पांची शहानिशा न करता मोठ्या गृहप्रकल्पांना पीएमआरडीएकडून पूर्णत्वाचे दाखले दिले जातात, अनेक गृहप्रकल्पात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असतो, रहिवाशांच्या तक्रारी असूनही कारवाईचा अभाव आहे, अशा प्रमुख तक्रारी आणि मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

दरम्यान १६ मार्च २०२३ रोजी स्वतः आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेच्या अधिवेशनात ह्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करीत कारवाईची मागणी केली होती. त्याअनुषंगाने गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत विविध मुद्द्यांवर पीएमआरडीएकडून स्पष्टता मागण्यात आली.

नियमबाह्य प्रकल्पांची संख्या आणि त्यांच्यावर केलेली कारवाई, प्रत्यक्ष किती प्रकल्पांची स्थळ पाहणी झाली आणि नव्याने सुरु होत असलेल्या प्रकल्पांबाबत प्राप्त अर्जाची संख्या किती या प्रश्नांची उत्तरे आमदार शेळकेंनी पीएमआरडीएकडे मागितली असून या सर्वच बाबतीत संबंधित विभागांना पुढील ८ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश विधानसभा उपाध्यक्षांनी दिले.

सदर बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, आमदार सुनील शेळके यांसह वने उपसचिव, पीएमआरडीए संचालक, नगरविकास अधिकारी, मावळ आणि मुळशीचे उपविभागीय अधिकारी, वनसंरक्षक, खनिकर्म अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात
– तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar


dainik maval jahirat

Previous Post

मराठी साहित्यातील लेखक प्रदीप कोकरे, कवी सुरेश सावंत यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Next Post

कासारसाई धरण परिसरात पावसाची संततधार सुरू ; धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला । Kasarsai Dam

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kasarsai Dam

कासारसाई धरण परिसरात पावसाची संततधार सुरू ; धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला । Kasarsai Dam

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.