Dainik Maval News : नायगाव येथील टोनी द ढाबा या हॉटेलमध्ये सोमवारी (दि. 23 जून) रोजी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटांतील सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना बुधवारी (दि. 25 जून) वडगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सातही जणांना 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलकुमार बागला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धेश विजयकुमार चावला आणि अन्य दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. तर, दीपाली देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिलकुमार बागला, एक महिला, नामदेव चोपडे, तितु सेजवाल यांना अटक करण्यात आली आहे.
नायगाव येथील टोनी द ढाब्याचे मालक विजय चावला यांच्या मृत्यूनंतर सदर हॉटेल आणि अन्य संपत्तीबाबत या दोन्ही कुटंबांमध्ये वाद सुरू आहेत. यातून दोन्ही गटात तुंबळ हाणामारीचा प्रकार सोमवारी घडला होता. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल असून गुन्ह्याचा अधिक तपास प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायणे करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके