Dainik Maval News : बोरज गावात आढळलेल्या 10 फूट लांबीच्या अजगराला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी पकडून त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली आहे. बोरज गावातील स्मशानभूमी परिसरात शनिवारी रात्री 9 च्या सुमारास निलेश बांगर यांना रस्त्याच्या बाजूस अजगर दिसल्याने त्यांनी याबाबत स्थानिक ग्रामस्थ पप्पू केदारी व बोरज गावचे पोलीस पाटील दिनेश केदारी यांना कल्पना दिली.
- पोलीस पाटील दिनेश केदारी यांनी तात्काळ वन्यजीवरक्षक दक्ष काटकर यांना अजगर आढळल्याची बातमी कळविल्यानंतर वन्यजीवरक्षक दक्ष काटकर, अनिल आंद्रे, यश वाडेकर हे त्याठिकाणी हजर झाले. सदर अजगर हा रस्त्याच्या बाजूला झुडपांत होता. त्यास अनिल आंद्रे आणि दक्ष काटकर यांनी त्यास व्यवस्थितरीत्या, काळजीपूर्वक पकडून त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली.
यावेळी त्याठिकाणी उपस्थित पोलीस पाटील दिनेश केदारी, ग्रामस्थ नवनाथ कडू, तेजस केदारी, सोमनाथ केदारी, रवी केदारी, अमर कडू, अनिल केदारी, विठ्ठल ठुले, मनोज मांडेकर, पांडुरंग मोहळ, ओमकार केदारी यांनीही मदत करून आभार मानले.
मावळ भागात गेल्या काही दिवसात 9 अजगर साप पकडण्यात आले असून ते नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. गेल्यावर्षी याच बोरज गावाशेजारील डोंगरभागात 15 फूट लांबीचा अजगर आढळला होता. पावसाचे प्रमाणे अधिक असल्याने अजगर साप हे मानववस्थीकडे धाव घेत आहे असं यावेळी प्राणीमित्रांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक
– महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा संपूर्ण नियमावली । Pune News
– वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval