व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकरी कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार !

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 30, 2025
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Gopinath Munde Farmers Accident Safety Sanugraha Grant Scheme Documents Procedure Information

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शेती व्यवसाय करताना अनेकदा अपघात होतात. कधी वीज पडते, कधी पूर येतो, तर कधी सर्पदंश किंवा विंचू दंश होतो. याशिवाय, विजेचा शॉक, रस्त्यावरील अपघात किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होऊ शकतो. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा ते अपंग होतात. घरातील कर्त्या व्यक्तीला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते आणि अडचणी येतात. अशा अपघातग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे.

योजनेची उद्दिष्ट्ये :
1. अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे.
2. शेती व्यवसायातील धोके कमी करणे.
3. शेतकऱ्यांचे मनोबल वाढवणे.
या योजनेत राज्यातील वहितीधारक खातेदार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य (आई-वडील, पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी) पात्र आहेत.
4. अर्जदाराचे वय 10 ते 75 वर्षे असावे.
5. अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा दोन डोळे, दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपयांची मदत मिळते.
6. एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपयांची मदत मिळते.
7. अर्ज करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

आवश्यक कागदपत्रे :
1. 7/1 उतारा
2. मृत्यूचा दाखला (अपघाती मृत्यू झाल्यास)
3. तलाठ्याकडील गाव नमुना नं. 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद
4. शेतकऱ्याच्या वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र)
5. प्रथम माहिती अहवाल (FIR)
6. स्थळ पंचनामा
7. पोलिस पाटील माहिती अहवाल
8. अपघाताच्या स्वरूपानुसार आवश्यक कागदपत्रे

अपघात –
या योजनेत रस्ता अपघात, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून हत्या, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल आणि अन्य कोणत्याही अपघातांचा समावेश आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक
– महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा संपूर्ण नियमावली । Pune News
– वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना; अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्षपदी विशाल विकारी यांची निवड – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

Next Post

पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा ! गतवर्षीपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक जलसाठा । Pawana Dam Updates

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana-Dam-Maval

पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा ! गतवर्षीपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक जलसाठा । Pawana Dam Updates

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.