व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर – वाचा सविस्तर

ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन करण्यासाठी एकरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांनी दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 30, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत ऊस लागवड हंगाम २०२५-२६ मध्ये कार्यक्षेत्रात ऊस लागवडी संदर्भात आडसाली, पूर्वहंगामी, सुरू ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर केले आहे.

Novel NIBR Ads

या हंगामामध्ये कमी कालावधीत जादा उत्पन्न देणारे ऊस बेणे को. ८६०३२ या बेण्यास प्राधान्य देऊन इतर जाती को. व्हीएसआय-१८१२१ व आडसाली, पूर्वहंगामाकरिता को. एम. ०२६५ उसाच्या लागवडीकरिता बेणे उधारीवर देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

  • जास्तीत जास्त ऊस लागवड होण्याच्या दृष्टीने लागवड हंगामात शेतकऱ्यांना कारखान्याच्या शिफारशीप्रमाणे चांगल्या प्रतीचे बेणे उधारीवर पोहोच करणे, उच्च प्रतीचे/मूलभूत प्रमाणित ऊस बेणे तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कारखान्याच्या शिफारशीनुसार खासगी व कारखाना साईटवरील नर्सरीमधून शेतकऱ्यांना ऊस रोपे वाटप तसेच ऊस उत्पादनासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे येथून उत्पादित द्रवरूप मल्टीमायक्रोन्युट्रंट, मल्टीमॅक्रोन्युटंट, जैव कीड नियंत्रण जैव संजीवक (वसंत ऊर्जा) आदी खते उधारीवर वाटप करण्यात येणार आहेत.

तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीची खते ताग बियाणे, ऊस पिकांवर किटक नाशक व बुरशी नाशक ड्रोनद्वारे फवारणीसाठी सवलतीच्या दराने ड्रोनची सुविधा, फवारणीसाठी खते, बायोकंपोस्ट खत, पाचट कुजविण्यासाठी जीवाणू कल्चरचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना संशोधन केंद्रावर प्रशिक्षणासाठी ५० टक्के फी कारखान्यामार्फत भरून पाठविण्याची व्यवस्था व इतर सुविधा कारखान्यामार्फत करण्याचे धोरण कारखान्याने हाती घेतलेले आहे.

ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन करण्यासाठी एकरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांनी दिली. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस संशोधन केंद्र बारामती व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्यावतीने कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञान योजना राबविली आहे. त्यासाठी उत्सुक शेतकऱ्यांनी आपली नावनोंदणी कारखान्याच्या शेतकी ऑफिसमध्ये करावी, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे यांनी दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक
– महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा संपूर्ण नियमावली । Pune News
– वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा ! गतवर्षीपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक जलसाठा । Pawana Dam Updates

Next Post

मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Vidhan Sabha Former MLA Krishnarao Bhegde Passes Away Talegaon Dabhade

मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.