व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनानगर : संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये मातृपूजन करून गुरू पौर्णमा साजरी

गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून आद्य गुरू म्हणुन मातृपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 11, 2025
in लोकल, ग्रामीण
Guru Poornima celebrated by performing Matru Puja at Sankalp English School Pawananagar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर येथे गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून आद्य गुरू म्हणुन मातृपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते. संस्थेचे उपाध्यक्ष पोपट कालेकर व माता पालकांच्या हस्ते गौतम बुद्ध, माता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

  • पूजास्थान पाट, रांगोळी आणि गुलाब पाकळ्यांनी सजविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपआपल्या मातांचे पदपूजन करून पुष्पगुच्छ देऊन नमस्कार केला. यावेळी शाळेतील वातावरण पूर्ण भक्तिमय झालेले होते. आई आणि गुरू यावर आधारित गीतांमुळे वातावरण प्रसन्न झाले होते. गुरू आणि माता यांच्यावर आधारित अनेक भित्तीपत्रके विद्यार्थी आणि शिक्षकां मार्फत तयार करण्यात आली होती.

यावेळी गुरू पोर्णिमेची पार्श्वभूमी, गुरू शिष्य परंपरा क्रीडा विभाग प्रमुख कैलास येवले यांनी, तर गुरूमहिमा पर्यवेक्षक बाळू कदम यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. माता सर्व वातावरण पाहून भारावून गेल्या होत्या. मनोगत व्यक्त करताना त्यांना आनंदाश्रू रोखता आले नाहीत.

कार्यक्रमासाठी माता पालक प्रतिनिधी आरती घारे, मधु दळवी, प्रतीक्षा करवंदे, पूनम दाभाडे, आरती कालेकर, सुहासिनी पाटील, दिपाली ढोरे, दिपाली यादव, सुजाता सोनवणे, पूनम कालेकर, श्रध्दा बोहरा, वृषाली लायगुडे, ज्योती शिर्के आदी माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत धनवे आणि विघ्नेश सावळे यांनी केले तर आभार उत्कर्ष ताकदुदे याने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नीता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, कल्याणी सावंत, शीतल शिर्के, राजश्री लोहार, केतकी गायकवाड, वैष्णवी सोनवणे, काजल पडवळ, प्राची आढाव आदींनी विशेष मेहनत घेतली.

आजच्या धावपळीच्या युगात आणि मोबाईल च्या नादात संस्कारांची कमतरता पाहायला मिळत आहे. पण शाळेच्या माध्यामातून असे उपक्रम राबवून निश्चितच संस्कृती आणि संस्कार जपले जात आहेत. – आरती संतोष घारे, प्रतिनिधी, माता पालक संघ

शाळेने राबविलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. समाजात वेगवेगळे गुरू भेटत असताना आपले आई वडील आणि आपले आचार्य यांचे आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांकडून हे संस्कारी कृत्य होत असताना खूप आनंद झाला. – सविता कालेकर, प्रतिनिधी, माता पालक संघ

संकल्प इंग्लिश स्कूल मध्ये गुरू पौर्णिमेनिमित्त मातृपूजन घेण्यात आले खूप आनंद वाटला. आमच्या मुलांवर चांगले संस्कार या मार्फत होत आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो. – पूनम दाभाडे, प्रतिनिधी, माता पालक संघ

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शिष्यवृत्ती परीक्षेत टाकवेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश ; दोन विद्यार्थिनींना जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान । Maval News
– महत्वाचा निर्णय ! पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत
– देहूरोड कॅन्टोन्मेंट भागातील विकासकामांसाठी विशेष निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; पालखी मार्गाच्या विकासाची घोषणा
– महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! ‘गणेशोत्सव’ महाराष्ट्र राज्याचा अधिकृत ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित


dainik maval jahirat

Previous Post

जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय ऐतिहासिक ; ‘सीबीएसई’मुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना नवचैतन्य

Next Post

देहू – देहूरोड मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश कांबळे; उपाध्यक्षपदी गणेश दुडम, प्रकल्प प्रमुखपदी रामकुमार आगरवाल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
executive committee of the Dehu-Dehu Road Marathi Journalists Association has been announced

देहू - देहूरोड मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश कांबळे; उपाध्यक्षपदी गणेश दुडम, प्रकल्प प्रमुखपदी रामकुमार आगरवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.