व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बेबडओहळ येथे कृषीकन्यांकडून कृषी मेळावा व चर्चासत्राचे यशस्वी आयोजन ; शेतकऱ्यांना मिळाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन । Maval

सदर कार्यक्रमास बेबड ओहोळ, उर्से, धामणे, शिवणे, पिंपळ खुंटे, गहुंगे, शिरगाव या गांवामधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 22, 2025
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
organization of agricultural fair seminar by at Bebadohal Farmers received guidance from experts Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषीकन्यांकडून ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत बेबड ओहळ ग्रामपंचायत येथे ‘कृषी मेळावा व चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.

  • सदर कार्यक्रमास बेबड ओहोळ, उर्से, धामणे, शिवणे, पिंपळ खुंटे, गहुंगे, शिरगाव या गांवामधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीनचंद्र बोराडे, उपकृषी अधिकारी – वडगाव, विकास गोसावी, उपकृषी अधिकारी – काळे कॉलनी, अश्विनी खंडागळे, सहाय्यक कृषी अधिकारी – बेबड ओहोळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना नवीन बोराडे यांनी शेतकऱ्यांना खरीप पिके उत्पादकता वाढविण्याच्या विविध उपाययोजना, विकास गोसावी यांनी कृषी व कृषी व्यवसायाशी निगडित शासकीय योजना आणि अश्विनी खंडागळे यांनी भाताची चारसुत्री पद्धतीने लागवडीबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. एम. डी. जगताप यांनी कृषी पर्यटनावर आणि डॉ. एस. एन. पाटील यांनी कृषी व्यवसायामध्ये व्यवस्थापनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे प्रश्न मांडले व त्यावर उत्तम उपायही सुचविण्यात आले. शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. टी. बी. देवकाटे व डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी येथील प्रभारी प्राचार्य डॉ. एम. डी. जगताप,उपप्राचार्य व समन्वयक डॉ. एस. एन. पाटील आणि कृषी व्यवसाय तज्ञ ए. एम. कदम, एस. आर. बेनके, व्ही. बी. घोलप, एच. एस. चिरमुरे, बी. के. चव्हाण, व्ही. डी. दरंदले व कार्यालयीन अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. अमृता चांडोले आणि कु. स्नेहा राऊत यांनी केले. आयोजन कृषीकन्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. उपस्थित मान्यवरांचे व शेतकरी बांधवांचे बेबड ओहोळ गावच्या सरपंच तेजल घारे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval
– राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ; ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद
– आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा


dainik maval jahirat

Previous Post

दिवंगत दुर्गसेवक राज बलशेटवार यांच्या स्मरणार्थ कामशेतमध्ये २७ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन । Kamshet News

Next Post

कांब्रे – कोंडिवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिंकी राऊत यांची निवड । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pinky Raut elected as Sarpanch of kambre Kondivade Group Gram Panchayat Maval

कांब्रे - कोंडिवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिंकी राऊत यांची निवड । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.