व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरणात 78.87 टक्के पाणीसाठा, पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील विसर्ग बंद । Pawana Dam Updates

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यातील अनेक गावे ही पवना धरणाच्या पाणीसाठ्यावर अवलंबून आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 23, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Pavana Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) पवन मावळ ( Pawan Maval ) विभागातील प्रमुख पवना धरणात ( Pavana Dam ) आजमितीस (दि. 23 जुलै) 78.87 टक्के इतका पाणीसाठा आहे. पवन मावळात पावसाचा जोर ( Rain Updates ) काहीसा ओसरला आहे, त्यामुळे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान पवना धरणाच्या बॅकवॉटर भागात मात्र कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असून यामुळे धरणात नित्याने काही प्रमाणात पाण्याचा येवा हा सुरू आहे.

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यातील अनेक गावे ही पवना धरणाच्या पाणीसाठ्यावर अवलंबून आहेत. गावखेड्यातील शेती, अनेक लहान मोठे उद्योग धंदे यांच्याकरिता पवना धरण जलाशय हे पाण्याचा प्रमुख स्त्रोत आहे. अशात सद्यस्थितीत पवना धरण 78.87 टक्के भरल्याने आणि पावसाचे पुढील दोन महिने बाकी असल्याने या भागातील नागरिकांची वर्षभराची पाण्याची चिंता जवळपास मिटली आहे.

बुधवार, दिनांक 23 जुलै 2025 रोजी सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरण क्षेत्रात मागील 24 तासात 29 मि.मी. इतका पाऊस झाला, यासोबत 1 जूनपासून झालेल्या पावसाची एकूण आकडेवारी ही 1459 मि.मी. इतकी आहे. गतवर्षी आजच्या तारखेला पवना धरणात 49.30 टक्के इतका पाणीसाठा होता, गतवर्षीच्या मानाने यंदा पवना धरण लवकर भरले असून सद्यस्थितीत धरणात 78.87 टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती धरण विभागाचे अधिकारी रजनीश बारिया यांनी ‘दैनिक मावळ’शी बोलताना दिली.

पवन मावळ हा अधिक पर्जन्यमान असलेला भाग आहे. या भागात शेतीसाठी अधिक पावसाची गरज असते. सद्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरीही लवकरच पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो पाऊस जसा शेतीसाठी फायदेशीर ठरेल, तसाच पवना धरण 100 टक्के भरून वर्षभराची पाण्याची चिंताही मिटेल, अशी सर्वांना आशा आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval
– राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ; ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद
– आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा


Previous Post

कांब्रे – कोंडिवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिंकी राऊत यांची निवड । Maval News

Next Post

पर्यटननगरीत पावसाचा मुक्काम कायम ; 24 तासांत 83 मि.मी. पाऊस, चालू वर्षात 3130 मि.मी. पावसाची नोंद । Lonavala Rain Updates

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala Rain Updates

पर्यटननगरीत पावसाचा मुक्काम कायम ; 24 तासांत 83 मि.मी. पाऊस, चालू वर्षात 3130 मि.मी. पावसाची नोंद । Lonavala Rain Updates

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.