Dainik Maval News : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विरोधक या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वारंवार शेतकर्यांबाबत असंसदीय भाषा वापरली असून विधानसभेत ते रमीचा खेळ खेळताना एका व्हिडिओतून दिसून आले. शासन भिकारी असल्याचे कोकाटे यांनी म्हटले. तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे डान्सबार चालवितात असा आरोप होत आहे. अशा व्यक्ती मंत्री म्हणून राहण्यास पात्र नसून मंत्री कदम व कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, तसेच मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी मावळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. याप्रसंगी पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, भोसरी विधानसभा संघटक भारतदादा ठाकूर, मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, युवासेना तालुका अधिकारी उमेश गावडे, तालुका सल्लागार मारुतीभाऊ खोले, रमेश जाधव, शांताराम भोते, समन्वयक रवींद्र गायकवाड, बाळासाहेब शिंदे, वडगाव शहरप्रमुख राहुल नखाते, देहूरोड शहरप्रमुख संदीप बालघरे, विभागप्रमुख उमेश दहीभाते, भरत भोते, उपविभागप्रमुख भरत वाटाणे, राहुल दवणे, शाखाप्रमुख गोपीनाथ चोरगे, शंकर दळवी, धीरज घारे, संदीप ढोरे, रामभाऊ कोकरे, यशवंत बोडके आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यातील शेतकर्यांबद्दल असंसदीय भाषा वापर करणे, पंचनाम्यासाठी अरेरावीची भाषा करणे, अधिवेशन सुरू असताना चक्क सभागृहात मोबाईलवर रमी खेळणे, वारंवार बेजबाबदार वक्तव्ये करणे, यामुळे शेतकरी व महाराष्ट्राची बदनामी होत आहे. कोकाटे यांच्या या अशोभनीय कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे. अशी बेजबाबदार व अहंकारी व्यक्ती राज्याच्या मंत्रिपदावर राहण्यास पात्र नाही. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी माणिकराव कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी आमची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने डान्सबार चालतो, अशा वादग्रस्त मंत्र्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी याबाबत राज्य सरकारने दखल न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा मावळ तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश आणि चावी वाटपाचा भव्य सोहळा संपन्न । Maval News
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची मागणी ; खासदार बारणे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट
– पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते अहिल्यानगर आणि तळेगाव-चाकण-उरुळी हे दोन रेल्वेमार्ग अस्तित्वात येणार
– श्रावण मास । नागपंचमी विशेष : श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप